18 Sixes, 19 Fours... 94 चेंडूंमध्ये 222 धावा; गोलंदाजाची सेंच्युरी! विक्रमांचा डोंगर
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने विक्रमी कामगिरी करत 416 धावांचा डोंगर उभा केला. हेनरिक क्लासेन और डेविड मिलरने 94 चेंडूंमध्ये तब्बल 222 धावांची पार्टनरशीप केली. याच पार्टरनशीपच्या जोरावर एवढी मोठी धावसंख्या उभारता आली.
दक्षिण आफ्रिकेने हा सामना 164 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 34.5 ओव्हरमध्ये 252 धावांवर ऑलाऊट झाला. मात्र या सामन्यातील मुख्य आकर्षण हेनरिक क्लासेन और डेविड मिलरची पार्टनरशीपच ठरली. या पार्टनरशीपने अनेक विक्रम मोडीत काढले हे कोणते हे पाहूयात...
हेनरिक क्लासेनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंच्युरीयनच्या मैदानावर 174 धावांची खेळी केली. कोणत्याही सामन्यामध्ये पाचव्या क्रमांकाला फलंदाजी करणाऱ्या खेळाडूने केलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
हेनरिक क्लासेन पाचव्या क्रमाकांवर सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर आहे. पहिल्या क्रमांकावर कपिल देव आहे. कपिल यांनी 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत झिम्बावेविरुद्ध नाबाद 175 धावांची खेळी केली होती.
25 व्या ओव्हरनंतर फलंदाजीला आल्यानंतर 174 धावा करणारा हेनरिक क्लासेन हा जगातील पहिलाच फलंदाज आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ए.बी. डिव्हिलियर्सच्या नावे होता. त्याने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 162 धावांची नाबाद खेळी केली होती. तसेच इतक्याच धाव्या जॉस बटलरने नेदरलॅण्डविरुद्ध केल्या होत्या.
हेनरिक क्लासेन और डेविड मिलर या दोघांनी 14.47 च्या सरासरीने धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 हून अधिक धावांची ही सर्वात वेगवान पार्टनरशीप ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या इयॉन मरॉर्गन आणि जॉस बटलरच्या नावे होता. या दोघांनी 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये 10.03 च्या सरासरीने 204 धावांची पार्टनरशीप केलेली.
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाने त्याच्या 10 षटकांमध्ये 113 धावा दिल्या. एकदिवसीय सामन्यामध्ये कोणत्याही गोलंदाजाने दिलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या आहे.
अॅडम झाम्पाने माईक लिव्हाइसच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 2006 साली झालेल्या 438 विरुद्ध 434 स्कोअरच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान जोहान्सबहर्ग येथे झालेल्या प्रसिद्ध सामन्यामध्ये माईकने तब्बल 113 धावा दिल्या होत्या.
हेनरिक क्लासेन और डेविड मिलर या दोघांनी शेवटच्या 10 ओव्हरमध्ये 173 धावा केल्या. कोणत्याही संघाने 41 ते 50 व्या सामन्यामध्ये केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावे होते. त्यांनी 164 धावा केलेल्या. नेदरलॅण्डविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम नोंदवला होता. हा विक्रमही हेनरिक क्लासेन और डेविड मिलरने मोडीत काढला आहे.
हेनरिक क्लासेनने केवळ 77 चेंडूंमध्ये 150 धावा पूर्ण केल्या. वेगवान 150 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हेनरिकने चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने वेगात 150 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हेनरिक दुसऱ्या स्थानी आहे.
हनरिकच्या आधी या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ए. बी. डिव्हिलियर्स आहेत. त्याने 2015 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये 64 चेंडूंमध्ये 150 धावा केलेल्या.
हेनरिक क्लासेन और डेविड मिलरने एकूण 222 धावांची पार्टनरशीप केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये पाचव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकांच्या फलंदाजांनी पहिल्यांदाच 200 हून अधिक धावांची पार्टनरशीप केली.
तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील पाचव्या क्रमाकांवरील ही पाचवी सर्वात मोठी पार्टनरशीप आहे. तर दक्षिण आफ्रिकेसाठी ही दुसरी सर्वात मोठी पार्टनरशीप आहे. सर्वात मोठी पार्टनरशीप दक्षिण आफ्रिकेचा जे. पी. ड्युमिनी आणि मिलरच्या नावावर आहे. या दोघांनी 2015 साली झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 256 धावांची पार्टनरशीप केलेली.
दक्षिण आफ्रिकेच्या डावामध्ये एकूण 20 षटकार लगावण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय सामन्यांमध्ये लगावले सर्वाधिक षटकार आहेत. यापूर्वी 2015 मध्ये मुंबईत झालेल्या सामन्यामध्ये 20 षटकार लगावण्यात आलेले.
सर्वाधिक षटकार लगाणाऱ्या संघांच्या यादीमध्ये दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे. 21 षटकारांसहीत इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानी आहे. इंग्लंडने 2018 साली नॉर्टिंगहॅममधील एकदिवसीय सामन्यात 21 षटकार लगावले होते.
दक्षिण आफ्रिकेने 7 व्यांदा 400 धावांचा टप्पा ओलांडला. सर्वाधिक वेळा 400 धावा करणाऱ्या संघांच्या यादीत दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यांनी भारतीय संघाला मागे टाकलं असून भारताने हा पराक्रम 6 वेळा केला आहे.