सानिया मिर्झाचा हा निर्णय सारं काही संपल्याचा इशारा? शोएबबरोबर घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच...

Swapnil Ghangale Thu, 03 Aug 2023-1:59 pm,

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे.

सानिया आणि शोएब दोघांमध्ये काहीतरी वाद असून त्यांचं एकमेकांशी पटत नसल्याची चर्चा सोशल मीडियापासून पाकिस्तानी प्रसारमाध्यमांपर्यंत सगळीकडेच दिसून आली.

मात्र आता सानिया आणि शोएब या दोघांनीही सोशल मीडियावर आपलं नातं संपुष्टात येणार असल्याचे इशारा दिला आहे. 

काही दिवसांपूर्वीच शोएब मलिकने आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये बदल केल्याचं पहायला मिळालं. त्याने या बायोमधून आपल्या पत्नीचं म्हणजेच सानिया मिर्झाचा उल्लेख वगळला. 

शोएब मलिकने आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये सानिया मिर्झाचा उल्लेख केला होता. 'हसबण्ड टू अ सुपरवुमेन' असं म्हणत शोएबने सानियाला थेट इन्स्टाबायोमध्ये टॅग केलं होतं.

 

शोएबने जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी इन्स्टाग्राम बायोमध्ये बदल केला. त्याने आपल्या आधीच्या बायोमधील 'हसबण्ड टू अ सुपरवुमेन' ही ओळ काढून टाकली.

शोएबने अचानक अशापद्धतीने सानियाचं नाव आपल्या इन्स्टाग्राम बायोमधून काढून टाकल्याने पुन्हा एकदा या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली.

ही चर्चा सुरु असतानाच आता सानियानेही आपल्या इन्स्टाग्राम खात्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सानियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शोएबबरोबरचे सर्व फोटो डिलीट केले आहेत.

मुलगा इजहान मिर्झा मलिकच्या वाढदिवसाचे काही फोटो आणि 'फादर्स डे'चे फोटो वगळल्यास सानियाने इन्स्टाग्रामवर शोएब मलिकबरोबरचे सर्व फोटो काढून टाकले आहेत.

शोएब आणि सानियाने घटस्फोटासंदर्भातील चर्चांवर कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

शोएब मलिकने इन्स्टाग्रामवरुन सानियाच्या नावाचा बायोमधील उल्लेख हटवलं असला तरी तिच्याबरोबरच फोटो अजूनही कायम आहेत.

केवळ सानियाचेही अनेक फोटो अद्याप शोएबच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळत आहेत.

वेगवेगळ्या देशांमधील फोटोंमध्येही शोएबबरोबर सानियाही दिसत आहे.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे दोघे 2010 साली लग्नबंधनात अडकले. शोएब आणि सानिया त्यांच्या लग्नानंतर 8 वर्षांनी म्हणजेच 2018 रोजी आई-वडील झाले.

2018 मध्ये सानियाने एका मुलाला जन्म दिलं. त्याचं नाव इजहान मिर्झा मलिक असं आहे.  सानिया आपल्या मुलाबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मुलगा इजहान मिर्झा मलिकच्या जन्मानंतर शोएब आणि सानिया यांच्यातील संबंध बिघडल्याचं सांगितलं जातं. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link