Sarkari Naukri : महाराष्ट्र शासनाकडून बंपर नोकरभरती; पाहा कशी असेल प्रक्रिया

Thu, 20 Apr 2023-8:16 am,

या साऱ्याची सुरुवात होते ती म्हणजे एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा तत्सम परीक्षा देत चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळवण्यापासून. 

तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? तर, महाराष्ट्र राज्य शासनाकडून तुम्हाला ही सुवर्णसंधी देण्यात येणार आहे. कारण, लाखोंच्या संख्येनं राज्यात नोकरभरती होणार आहे. 

सध्याच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 1 लाख 45 हजार पदांची भरती होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदभरतीचा आढावा घेण्यात आला. 

तूर्तास राज्य सेवेतील 75 हजार पदे भरण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. पण, प्रत्यक्षात मात्र विविध विभागांच्या मागणीनुसार ही पदसंख्या 1,45,000 वर गेली आहे. 

यापेकी 6500 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.  ऑगस्ट 2023 पर्यंत 75 हजार पदं भरली जातील, असंही सांगण्यात येत आहे. 

भरती प्रक्रियेला वेग देण्यासाठी सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत न येणाऱ्या गट ब, क आणि ड संवर्गातील पदांसाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपी’ या कंपन्यांची निवड केली आहे. 

लोकसेवा आयोगाच्या परिघात येणाऱ्या पदांची भरती मात्र नियमित सुरू आहे. थोडक्यात येत्या काळात राज्यात अनेकांनाच सरकारी नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध असेल

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link