America Snow Storm Photos : घरं, कारमध्ये गोठले मृतदेह; विचार करूनही मन सुन्न होणारी अमेरिकेतील दृश्य

Thu, 29 Dec 2022-7:42 am,

America Snow Storm : यंदाच्या वर्षी ख्रिसमची धूम सुरु असतानाच अमेरिकेमध्ये मात्र वातावरण काहीसं चित्र पाहायला मिळाली. आर्क्टिक डीप फ्रीज (Arctic Deep Freeze) मुळं आलेल्या या वादळानं अनेकांचा बळी घेतला. 

हिमवादळामुळं कॅनडाच्या सीमेनजीक असणाऱ्या ग्रेटर बफेलो रीजन लेक भागाला या वादळाता मोठा तडाखा बसल्याचं पाहायला मिळालं. 

साधारण आठवड्याभरापासून सुरु असणाऱ्या या संपूर्ण परिस्थितीमुळे अमेरिकेत येणारी आणि तिथून निघणारी हजारो उड्डाणं रद्द करण्यात आली. हिमवादळामुळं प्रभावित झाली नाही, अशी एकही गोष्ट सध्या या भागात पाहायला मिळत नाहीये. 

इथं घरांमध्ये, वाहनांमध्ये अडकलेल्या काही नागरिकांचा मृत्यूही ओढावल्यामुळं एकच शांतता पसरली आहे. निसर्गाचं हे महाभयंकर रुप फक्त अमेरिकाच नव्हे, संपूर्ण जगाला हादरवून सोडत आहे. 

 

पेट्रोल पंप, नद्या- नाले, इतर जलस्त्रोत सर्वकाही गोठल्यामुळं इथे दळणवळणाच्या सुविधाही प्रभावित झाल्या आहेत. तर, अनेक घरांच्या दारापुढेही बर्फाचे थर असल्यामुळं नागरिकांच्या खाण्यापिण्याचीही आबाळ होताना दिसत आहे. 

Arctic Blast मुळं अमेरिकेवर Bomb Cyclone धडकलं. थोडक्यात यामध्ये उत्तर ध्रुवाकडून थंड वारे अमेरिकेच्या दिशेनं आले आणि येथील तापमानात लक्षणीय घट झाली. बहुतांश भागांमध्ये तापमान उणे 57 अंशांहूनही कमी झालं आहे. सध्याच्या घडीला ही परिस्थिती सुधारण्याचीच सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link