कोण होणार टीम इंडियाचा बॉलिंग कोच? वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या `या` तीन दिग्गजांची नावं चर्चेत!
टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ बदलल्याने आता गौतम गंभीरच्या मार्गदर्शनासाठी नवा कोचिंग स्टाफ घेण्यात येणार आहे. आता टीम इंडियाचा बॉलिंग कोच कोण असणार? असा प्रश्न विचारला जातोय.
बीसीसीआय गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी झहीर खान आणि लक्ष्मीपती बालाजी यांच्या नावावर चर्चा करत आहे. दोघांनीही टीम इंडियाची महत्त्वाचं योगदान दिलंय.
बीसीसीआयला विनय कुमारच्या नावात रस नाही, अशी माहिती देखील समोर आली आहे. मीडियाच्या माहितीनुसार, गौतम गंभीरने विनय कुमारचं नाव सुचवलं होतं.
झहीर खानकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. तो जगाच्या कानाकोपऱ्यात क्रिकेट खेळला आहे. तसेच वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याचं महत्त्वाचं योगदान आहे.
दरम्यान, झहीर खान आणि लक्ष्मीपती बालाजी यांच्याशिवाय आशिष नेहरा याचं नाव देखील घेतलं जातंय. मात्र, नेहराला संधी मिळणार का? यावर अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.