1 रुपयात जेवण ते शहिदांच्या मुलांचं शिक्षण; गौतम गंभीरकडे किती संपत्ती? BCCI किती देणार पगार?

Pravin Dabholkar Wed, 10 Jul 2024-9:41 am,

Team India Head Coach Salary: टीम इंडियाला आपला नवीन हेड कोच मिळाला आहे. बीसीसीआयने गौतम गंभीरला टीम इंडियाचा हेड कोच म्हणून नियुक्त केलंय. राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर हेड कोच म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे. 

हेड कोच गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मोठा पगार मिळणार आहे. गौतम गंभीर हा देशातील श्रीमंत क्रिकेटपट्टुंच्या यादीत येतो. त्याच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. असे असताना तो गरजूंची सेवादेखील करतो.

गौतम गंभीरने दिल्लीमध्ये जन रसोई आणि जन लायब्ररी सुरु केली आहे. येथे गरजुंना केवळ 1 रुपयांमध्ये पोटभोर अन्न मिळत. तर लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात शिकण्याची सुविधा मिळते. यासोबतच गंभीर शहिदांच्या मुलांसाठीदेखील काम करतो. 

कोचपदी नियुक्ती करताना गौतम आणि बीसीसीआयमध्ये खूप वेळ चर्चा झाली. टीम इंडियाचा हेड कोच म्हणून गंभीरला 12 कोटी किंवा त्याहून जास्त पगार मिळू शकतो. या वृत्ताला कोणता अधिकृत दुजोरा मिळाला नाहीय. 

टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाचा हेड कोच द्रविडला वार्षिक 12 कोटी रुपये पगार मिळायचा. टिम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांना वार्षिक 9.5 कोटी मिळायचे. गंभीरचा पगार हा द्रविड इतकाच असू शकतो, असे म्हटले जात आहे. 

देशातील श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत असलेला गंभीर खूपच धनवान आहे. त्याची एकूण संपत्ती 205 ते 250 कोटींच्या दरम्यान असल्याचे म्हटले जाते. त्याच्या वडिलांचा दिल्लीमध्ये टेक्सटाईल व्यवसाय आहे. 

तसेच गंभीरला क्रिकेटमधून चांगली कमाई होते. 2019 मध्ये क्रिकेटला रामराम केल्यानंतर त्याने राजकारणात पाऊल ठेवले. पूर्व दिल्लीतून तो भाजपचा खासदार राहिलाय. 

द मिंटच्या रिपोर्टनुसार, गौतम गंभीरची वार्षिक कमाई 12.40 कोटी इतकी आहे. त्याच्या बायकोची वार्षिक कमाई साधारण 6.15 लाख इतकी आहे. आयपीएलच्या एक सिझनमध्ये कॉमेंट्री करण्यासाठी तो 3 कोटी रुपये घेतो. 

तर केकेआरचा मेंटोर म्हणून त्याला 25 कोटी रुपये पगार मिळतो. याशिवाय तो जाहिरांतीमधूनही खूप कमाई करतो. त्याच्याकडे क्रिकप्ले, फॅंटसी गेमिंग, रेडिक्लिफ लॅब्ससारख्या जाहिराती आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link