Tech Knowledge : किती दिवस रिचार्ज न केल्यानंतर SIM बंद होतं; ते दुसऱ्याच्या नावावर कधी इश्यू होतं?

Tue, 30 Jan 2024-11:37 am,

अनेकांकडे दोन सिम कार्ड असतात. त्यामागील कारणं ही वेगवेगळी असतात. पण बहुतेक वेळा आणीबाणीच्या परिस्थितीसाठी किंवा बाहेरगावी गेल्यावर नेटवर्कचा इश्यू यामुळे एकापेक्षा जास्त SIM कार्ड ठेवतात. 

अनेकांना आपला मोबाईल नंबर गमावयचा नसतो. तो अनेकांसाठी खास असून त्यावर अनेक महत्त्वाचा सेवा देण्यात येतात. अशावेळी जर तुम्ही अनेक दिवस तो नंबर रिचार्ज केला नाही तुम्हाला तो नंबर गमवावा लागू शकतो. 

नियमानुसार, जर तुम्ही सिम कार्ड 6० दिवस म्हणजे 2 महिने रिचार्ज केलं नाही तर ते सिम बंद करण्यात येतं. 

यानंतर 6 ते 9 महिन्यांचा वेळ तुम्हाला देण्यात येतो. या काळात तुम्ही नंबर पुन्हा रिचार्ज करायचा असतो. त्यानंतर तुमचं सिम कार्ड सक्रिय होतं. 

जर तुम्ही सिम रिचार्ज केल्यानंतरही वापरत नसाल तर कंपनी तुम्हाला इशारा देत. त्यानंतरीही तुम्ही तो वापर नाही, अशा परिस्थितीत कंपनी सिम संपण्याची प्रक्रिया करते. 

त्यानंतर काही महिन्यांतच हा सिम क्रमांक दुसऱ्या युजरला ट्रान्सफर करण्यात येतं. 

या प्रक्रियेला साधारण एक वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सिम ट्रान्सफर होण्यासाठी एक वर्ष लागतो. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link