दोन दिवसांच्या पिकनीकसाठी मुंबईजवळील प्रसिद्ध ठिकाणे, बॅग भरो निकल पडो...

Mansi kshirsagar Tue, 05 Mar 2024-7:22 pm,

रोजची कामे व ऑफिसची गडबड याने थकून जायला होते. त्यामुळं ऑफिसच्या आणि रोजच्या कामातून थोडा ब्रेक घेऊन एक छान सुट्टी एन्जॉय करा. मुंबईजवळच अशी काही टुरिस्ट स्पॉट आहेत जिथे फिरायला तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमचा थकवाही निघून जाईल. 

मार्च महिन्यात शुक्रवार-शनिवार-रविवार या तीन सुट्ट्या जोडून आल्या आहेत. त्यामुळं या सुट्टीत तुम्ही छोटीशी विकेंड ट्रिप प्लान करु शकतात. 8 मार्च रोजी शुक्रवारी महाशिवरात्री आल्याने काही ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, त्यानंतर शनिवार-रविवार आहेत. 

छोटीसी ट्रिप प्लान करत असाल तर माथेरान हा खूप छान पर्याय आहे. मुंबईजवळच असल्याने प्रवासाचा फार थकवाही जाणवणार नाही. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. मुंबईपासून फक्त 100 किमी अंतरावर माथेरान आहे. 

 

रायगड तालुक्यातील अलिबागमध्ये अनेक सुंदर समुद्र किनारे आहेत. समुद्र किनारा, हिरवाईने नटलेले डोंगर आणि प्राचीन स्थळे इथे पाहण्यासारखे आहेत. मांडवा जेट्टी, आवास बीच, रेवदंडा, किहिम बीच, नागांव येथे तुम्ही फिरु शकता. मुंबईहून M2M फेरीनेही अलिबागला जाता येऊ शकते. 

लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले आहे. पुण्यापासून 64 किमी अंतरावर तर मुंबईपासून 81.9 किमी अंतरावर आहे. येथे तुम्ही खंडाळा, राजमाची पॉइंट, टायगर पॉइंट, कार्ला लेणी, लोहगड किल्ला, भुशी धरण ही प्रेक्षणी स्थळ पाहू शकता. 

लवासा हे पुणे जिल्ह्यातील पहिले खासगी हिल स्टेशन आहे. मुंबई आणि पुण्याजवळ हाकेच्या अंतरावर लवाला आहे. येथे तुम्ही तुमचा विकेंड छान घालवू शकता. लवासात आल्यावर परदेशात आल्यासारखे वाटते. लवासा वरसगाव नदी किनारी वसवलेले आहे. 

 भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यातील एक पर्यटन स्थळ आहे. प्रवरा नदीच्या किनारी हे वसलेले आहे. निसर्गाने नटलेले भंडारदरा खूपच सुंदर आहे. येथील धबधबे पाहून सर्व टेन्शनच विसरुन जाल. हिवाळ्याच्या दिवसात व पावसाळ्यातही तुम्ही येथे भेट देऊ शकतात. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link