Tulsi Vastu: तुळशीच्या आजूबाजूला चुकूनही ठेऊ नका या 4 गोष्टी; घरावर येऊ शकतं आर्थिक संकट

Fri, 10 Mar 2023-9:44 pm,

तुळशीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. तुळशीचं रोप घरात असेल तर सुख-शांती आणि समृद्धी येते असं म्हणतात. म्हणूनच रोज सकाळी तुळशीची आवर्जून पूजा केली जाते. 

पौराणिक मान्यतांनुसार तुळशीला तुळशी माताही म्हटलं जातं. भगवान विष्णूला तुळस प्रिय असते. तुळशीची नीट देखभाल केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. भगवान विष्णू प्रसन्न झाल्याने त्यांची पत्नी म्हणजेच लक्ष्मी माता प्रसन्न होते. त्या घरावर लक्ष्मी माता प्रसन्न असते अशा घरावर आर्थिक संकट येत नाही.

मात्र ज्याप्रमाणे तुळशीमुळे समृद्धी येते त्याचप्रमाणे तुळशीची देखभाल करण्याचे काही विशेष नियम आहे. चुकीच्या पद्धतीने तुळशीची देखभाल केल्यास त्याचे विपरित परिणाम होऊन दारिद्र्य येऊ शकते, असंही मानलं जातं.

धार्मिक मान्यतांनुसार अंगणामध्ये किंवा घरात तुळशीचं रोपटं असेल तर विशेष काळजी घेणं बंधनकारक असतं.

तुळशीपासून काही गोष्टी आवर्जून दूरच ठेवाव्यात असं सांगितलं जातं. नेमक्या कोणत्या गोष्टी तुळशीपासून दूर ठेवल्याने सुख, समृद्धी आणि शांती घरात नांदते ते पाहूयात...

चप्पल किंवा बूट तुळशीजवळ ठेऊ नयेत असं धार्मिक मान्यतांनुसार सांगतात. चप्पल आणि बूट तुळशीच्या आजूबाजूला ठेवणं हे लक्ष्मीचा अपमान मानला जातो.

 

तसेच चप्पल आणि बूट राहूचे प्रतिक मानले जातात. त्यामुळे त्या तुळशीच्या बाजूला ठेवल्यास घरावरील संकट वाढतील असं म्हटलं जातं.

कचरा अथवा कचऱ्याचा डबा तुळशीच्या आजूबाजूला असून नये असं म्हणतात. हा सुद्धा तुळशीचा अपमान मानला जातो.

अशाप्रकारे तुळशीचा अनादर केल्याने तुळशी माता घरावर नाराज होते असं म्हणतात. त्यामुळे लक्ष्मीचा घरावर कोप होतो आणि घरात मोठं आर्थिक नुकसान होतं असं म्हटलं जातं. 

झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं मात्र झाडूचा वापर हा साफसफाईसाठी केला जातो. त्यामुळे झाडू तुळशीजवळ ठेऊ नये. असं करणं म्हणजे सुख, समृद्धी आणि शांतता स्वत: भंग करण्यासारखा प्रकार मानला जातो.

तुळशीच्या आजूबाजूला गणपतीची मूर्ति ठेवू नये. यामागील कारण एका पौराणिक कथेमध्ये असल्याचं सांगितलं जातं.

या कथनेनुसार एकदा गणपती नदी किनाऱ्यावर ध्यानमग्नावस्थेत बसलेला असताना तुळशीने त्याला लग्नाचा प्रस्ताव दिला. गणपतीने हा प्रस्ताव नाकारल्यानंतर तुळशीने त्याला शाप देत तुझी दोन लग्नं होतील असं म्हटलं. याच कारणामुळे तुळशीजवळ गणपतीची मूर्ती ठेऊ नये असं म्हणतात.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link