...म्हणून सचिन तेंडुलकर World Cup Trophy घेऊन मैदानात आला; जाणून घ्या कारण

Swapnil Ghangale Thu, 05 Oct 2023-3:23 pm,

सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडचा आणि मैदानात पहिल्यांदाच पाऊल ठेवलं सचिनने... जाणून घ्या यामागील खास कारण

झालं असं की, इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यानच्या सामन्याआधी वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात झाली. या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन मैदानामध्ये आला.

सचिनने मैदानामध्ये एन्ट्री घेताच टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांनी सचिनचं अगदी उत्साहामध्ये स्वागत केलं.

सचिन काळ्या रंगाच्या सुटाबुटात गॉगल घालून फारच स्मार्ट दिसत होता.

सचिन वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन मैदानात दाखल झाला आणि त्याने ती ट्रॉफी पोडियमवर ठेवली.

सचिनने ट्रॉफी पोडियमवर ठेवल्यानंतर त्याने या ट्रॉफीकडे निरखून पाहिलं. हा क्षण कॅमेरामध्ये कैद झाला.

नंतर सामनाधिकारी असलेल्या जवागल श्रीनाथबरोबर सचिनने हस्तांदोलन केलं.

सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेचा जागतिक ब्रॅण्ड अॅम्बेसिडर असल्याने त्याला ही ट्रॉफी मैदानात घेऊन येण्याचा मान देण्यात आला होता.

2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालीच सचिनच्या निवृत्तीआधीच्या शेवटच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताने हीच ट्रॉफी जिंकली होती.

सचिनने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये घेतलेल्या एन्ट्रीचे तसेच वर्ल्डकप ट्रॉफी हातात पकडलेले आजच्या सामन्याआधीचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहेत.

काल म्हणजेच वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्याच्या एक दिवस आधीच याच मैदानावर सर्व संघांचं नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांचं वर्ल्डकपच्या या ट्रॉफीबरोबर विशेष फोटोसेशन पार पडलं होतं. आजपासून पुढील 45 दिवस 10 संघ ही ट्रॉफी जिंकण्यासाठी एकमेकांविरोधात खेळणार आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link