Weather Update Maharashtra: `या` भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, मुंबईतही उन्हाचा चटका वाढणार, तुमच्या भागातील स्थिती जाणून घ्या

Sun, 02 Apr 2023-9:11 am,

एप्रिल महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या पश्चिम भागात म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आलाय. 

 

एप्रिल महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात सरासरी ते सरासरीहून अधिक पावसाची तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचीही शक्यात आहे. दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांचं तापमान हे 40 अंशापुढे गेल्यामुळं नागरिक त्रस्त आहेत.

यावर्षी एप्रिल ते जून या महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात तापमान सरासरीहून अधिक राहणार आहे. राज्याच्या काही भागांत उष्णतेच्या लाटा येण्याचा इशाराही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याचं तापमान हळूहळू वाढत आहे. वायव्य भारतातील काही भाग आणि द्वीपकल्पीय प्रदेश वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये एप्रिल ते जून या कालावधीत कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितलं आहे.

नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 

एप्रिल महिन्यात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालचा दक्षिणेकडील भाग, उत्तर छत्तीसगड, गुजरात, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब हरियाना राज्यांत तीव्र उष्ण लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link