Weekly Numerology : `या` मूलांक लोकांच्या दारावर होणार लक्ष्मीचं आगमन, तुमच्या भाग्यात काय?

Sun, 05 May 2024-2:35 pm,

 मे महिन्याच्या या आठवड्याची सुरुवात मासिक शिवरात्रीने होते आहे. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीसह प्रीति योग आहे. त्यात हा अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंतीचा आठवडा अंकशास्त्रानुसार काही राशींसाठी भाग्यशाली आहे, असं अंकशास्त्र डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. जाणून घ्या 1 ते 9 मूलांक असलेल्या लोकांचं अंकशास्त्र साप्ताहिक राशीभविष्य 

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. वहारिक कौशल्ये आणि तुमच्या सर्जनशील कार्यातून तुम्हाला यश मिळाला आहे. या आठवड्यात तुम्ही तुमचे पैसे संबंधित निर्णय विचारपूर्वक घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. प्रेमसंबंधात अहंकाराचा संघर्ष टाळल्यास हिताच ठरेल. सप्ताहाच्या शेवटी जीवनात सुख-समृद्धी आणि प्रसन्न वातावरण असेल. 

या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुम्हाला जबाबदारी देण्यात येणार आहे. प्रकल्पाबाबत गंभीर राहिल्यास यश तुम्हाला गाठता येईल. आर्थिक बाबतीत अधिक खर्च होणार आहे. प्रियजनांमध्ये नातं जरा कठोर होईल. प्रेमसंबंधांमध्ये बाह्यहस्तक्षेप करु देऊ नका. 

 

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे अनेक संधी तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक बाबतीतही काळ अनुकूल असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. प्रेमसंबंधात नातं मजबूत होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी लकी ठरणार आहे. 

 

कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या शुभ संधी गवसणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात सन्मान लाभणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच बँक बॅलेन्स वाढणारी बातमी मिळणार आहे. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम मजबूत करणार ठरणार आहे. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनात आनंदी होणार आहात. आठवड्याच्या शेवटी काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. 

या आठवड्यात तुम्ही संयमाने पुढे गेल्यास तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला मिळालेलं आश्वासने या आठवड्यात पूर्ण होणार आहे. कामाच्या ठिकाणी अहंकाराचे भांडण टाळणं हिताचं ठरेल. आर्थिक खर्च अधिक होणार आहे. गुंतवणुकीवर लक्षकेंद्रीत करा. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलणं हिताच ठरेल. 

 

या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागणार आहे. तेव्हाच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करु शकणार आहात. आर्थिक दृष्टीकोनातून हा आठवडा लाभदायक असणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये अहंकाराचा संघर्ष टाळल्यास चांगले परिणाम मिळणार आहे.परस्पर प्रेम देखील हळूहळू दृढ होणार आहे. आठवड्याच्या शेवटी मन काही गोष्टींबद्दल अस्वस्थ असणार आहे. 

आर्थिक दृष्टिकोनातून या आठवड्यात धनसंपदा वाढवणारा ठरणार आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होणार आहात. कार्यक्षेत्रातील निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रेमसंबंधांमध्ये चांगले दिवस येतील. आठवड्याच्या शेवटी पार्टीचा मूड असणार आहे. 

 

कार्यक्षेत्रात प्रगती पाहून तुम्ही प्रसन्न असणार आहात. आर्थिक बाबतीत या आठवड्यात तुम्ही व्यस्त असणार आहात. गुंतवणुकीतून जागरूक मार्ग काढा. आर्थिक लाभाचे शुभ संयोग या आठवड्यात जुळून आला आहे. प्रेमाच्या नात्यात नातं मबजूत होणार आहे. प्रियजनांसोबत सुंदर वेळ घालवणार आहात. या वेळी कोणतीही नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येणार आहे. 

कामाच्या ठिकाणी प्रगतीसोबत मान सन्मान घेऊन आलेला हा आठवडा आहे. तुमच्या मताचं कौतुक होणार आहे. तुमचे विरोधकही तुमच्या दूरदृष्टीने प्रभावित होणार आहेत. या आठवड्यात आर्थिक लाभ होणार आहे. प्रेमसंबंधातील नवीन सुरुवात तुमच्या जीवनात शांतता आनंद आणणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुमची निष्काळजीपणा त्रास सहन करावा लागू शकतो. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)  

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link