Weight Loss Tips : उन्हाळ्यात या गोष्टी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, यापासून लांब राहणे योग्यच

Surendra Gangan Sat, 06 May 2023-10:47 am,

केळी ही सगळ्या ऋतुत उपलब्ध असतात. केळी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, केळी वजन वाढवण्याचे काम करते. तुम्ही केळ्यापासून बनवलेल्या गोष्टी जसे की केळीचा शेक किंवा केळी चाट खाल्ले तर तुमचे वजन झपाट्याने वाढू लागते, त्यामुळे केळ्यांचे सेवन करा पण जास्त करु नका. अन्यथा तुमचे वजन वाढलेच म्हणून समजा.

मे महिना म्हटला की आंब्याचा सिझन असतो. आंबा खायला अनेकांना आवडतो, पण तो वजन वाढवण्याचे काम करतो. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर आंबा खाऊ नका.

अनेकांना दूध पिण्यास आवडते. फुल क्रीम दूध आरोग्यासाठी चांगले आहे पण ते वजन वाढवण्याचे काम करते. म्हणूनच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी फुल क्रीम दूध पिणे टाळावे.

अनेकांना बटाटा खाणे आवडते. मात्र, ही आवड चांगलीच महागात पडू शकते. तुम्हाला माहीत आहे का, बटाटा तुमचे वजन वाढवण्याचे काम करतो.

वजन वाढू द्यायचे नसेल तर तुम्ही दररोज ड्रायफ्रुट्सचे सेवन करु नका. जर करत असाल तर लक्षात घ्या की ते तुमचे वजन वाढवण्याचे काम करतात.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link