Restaurant मधलं खायचंय पण, बिलावरचं GST पाहून धडकी भरते? वापरा ही ट्रीक
रोजरोज घरचं जेवण जेवून कंटाळा आला की, बऱ्याचदा अनेकजण हॉटेलात जाऊन तयार जेवणावर ताव मारायचा बेत आखतात.
टेबलावर येणारे चमचमीत पदार्थ, त्यांच्या चवी हे सारंकाही हवंहवंसं वाटतं. पण, जेवण उरकल्यानंतर बिलाच्या रकमेत पदार्थांच्या दरांसोबतच जोडला जाणारा जीएसटी मात्र सारी चव बिघडवतो.
तुम्हाला एक गोष्ट माहितीये का, सरकारनं GST चं धोरण लागू केलंय खरं. पण, सरसरकट सर्वच रेस्तराँ तो आकारू शकत नाहीत. परिणामी इथं तुमचे पैसे हमखास वाचणार.
हे रेस्तराँ जीएसटी आकारू शकत नाहीत कारण ते या धोरणाचा भाग नाहीत. जीएसटी कॉम्पोजिशन अंतर्गत हॉटेल मालकांना वार्षिक कमाईवर कर भरावा लागतो. हा जीएसटी सामन्य दराहून कमीच असतो.
1.5 कोटींहून कमी टर्नओवर असणारा एखादा लघु व्यावसायिक या योजनेचा फायदा घेऊ शकतो. म्हणजेच जीएसटी कॉम्पोजिशन स्कीमचा फायदा घेणारे रेस्तराँ जीएसटी आकारू शकत नाहीत
त्यामुळं इथून पुढं जेवणासाठी एखाद्या रेस्तराँमध्ये जाणार असाल तर एक बाब लक्षात घ्या की ते ठिकाण जीएसटी कॉम्पोजिशन स्कीमच्या अख्त्यारित येतंय की नाही.
किंबहुना अशा सर्व रेस्तराँनी त्यांच्या बिलांवर “Composition taxable person, not eligible to collect tax on supplies” असं नमूद करणं अपेक्षित आहे. ही ओळ असल्यास तुम्ही जीएसटी भरणं अपेक्षित नाही हे कायम लक्षात ठेवा.