PHOTO: जैन मुनींच्या अंत्यसंस्काराला का लावली जाते बोली? त्या पैशांचं नंतर काय केलं जातं?

दक्षता ठसाळे-घोसाळकर Wed, 24 Jul 2024-4:31 pm,

जैन समाज मुनींच्या अंत्यसंस्काराबाबत बोली लावली जाते. कारण जैन मुनींचे स्वागत किती भव्य असते हे आपण सारेच जाणतो. कोणतेही जैन मुनी कोणत्या ठिकाणी गेले तर त्यांच्या स्वागताच्यावेळी हेलिकॉप्टरने पुष्प वृष्टी केली जाते. अशाच जैन समाजातील नियमांबद्दल जाणून घ्या. 

जैन धर्मात साधुंच्या 11 भूमिकांमध्ये उल्लेख केला आहे. 11 भूमिकांमध्ये सर्वात पहिली भूमिका क्षुल्लक मानली आहे. क्षुल्लक म्हणजे लहान. यामध्येही क्षुल्लक आणि ऐकल असे असते. क्षुल्लका आणि ऐलक साधू दोघेही अन्नाची याचना करतात. क्षुल्लक साधू त्यांच्याबरोबर एक कोपिन आणि एक चादर घेऊन जातात, तर ऐलक फक्त कोपिन घेऊन जातात आणि त्यांच्या तळहाताच्या बोटांनी अन्न खातात. ऐलक केशलोंच करतात. 

जैन मुनी सल्लेखनाच्य माध्यमातून आपला देह सोडतात. याला समाधी घेणे किंवा संथारा असे देखील म्हणतात. मृत्यू जवळ आल्याचे समजून स्वीकारली जाणारी प्रथा आहे. यामध्ये जेव्हा जैन साधु किंवा साधवी यांना जाणवते की, ते मृत्यूच्या जवळ आले आहेत तेव्हा ते अन्न-पाण्याचा त्याग करतात. दिगंबर जैन समाजात याला समाधी घेणे किंवा सल्लेखना असे म्हटले जाते. आणि श्वेतांबरमध्ये संथारा म्हटलं जातं. 

संथाराच्या माध्यमातून देह त्याग करणाऱ्या जैन मुनींचे अंत्य संस्कार के झोपून केले जात नाही. तर बसून करण्याची पद्धत आहे. देह त्याग करणाऱ्या मुनींचे पार्थिव शरीर एका पालखीमध्ये बसवले जाते आणि अंत्ययात्रा काढली जाते. पार्थिव शरीराला लाकडाच्या खुर्चीत बसवून बांधले जाते. पाहिल्यावर असं जाणवतं की, मुनी ध्यान मुद्रेत बसून ईश्वराचे स्मरण करत आहेत. 

जैन धर्मातून त्यागाचं महत्त्व शिकवलं जातं. इंद्रियांवर विजय मिळवून कुणीही जैन मुनी होऊ शकतो. या जगातील सगळ्या गोष्टी या मोहमाया असल्याचा संदेश जैन धर्मात दिला जातो. याचा त्याग करुन परमेश्वराला प्राप्त केले जाते. यामुळेच शरीराप्रती वैराग्य निर्माण करुन कठीण साधना करुन जैन मुनी होऊ शकता. 

असं म्हटलं जातं की, जैन मुनींच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी बोली लावली जाते. काही लोकं याबाबत नकार देतात. पण काही लोकांचं म्हणणं आहे की, अंत्ययात्रेत अनेक लोक स्वखुषीने दान करतात. या दानमधून मिळालेल्या पैशाचा वापर सामाजिक कार्यासाठी आणि गरीब लोकांच्या कल्याणासाठी केला जातो. म्हणून जैन मुनींच्या अंत्ययात्रेत खांदा देण्यासाठी बोली लावली जाते.

ही बाब आतापर्यंत फक्त चर्चेचा विषय आहे याबाबत कुठेही लिखित असा उल्लेख नाही. त्यामुळे झी 24 तास या बातमीचा दावा करत नाही. एक माहिती म्हणून ही देण्यात आली आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link