दूध, बटाटा, दह्यासोबत `हे` पदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील 200 हून अधिक आजार!
जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी 7 जून रोजी साजरा केला जातो. पौष्टिक पदार्थांचे सेवन न केल्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, असुरक्षित अन्नामुळे दररोज 1.6 दशलक्ष लोक आजारी पडतात. यामुळे डायरियापासून कॅन्सरपर्यंत 200 आजार होऊ शकतात.
काही पदार्थ एकत्र खाण्यास मनाई आहे. यामुळे, खराब पचन, विष तयार होणे, पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता आणि अन्नातून विषबाधा होऊ शकते. अन्न विषबाधा झाल्यास काही लक्षणे दिसू शकतात. यामध्ये अतिसार, पोटदुखी, मळमळ, उलट्या, ताप, थंडी वाजून येणे इ. म्हणूनच खालील पदार्थ एकत्र कधीच खाऊ नयेत.
दुधासोबत फळे, खरबूज, आंबट फळे, केळी, समोसे, पराठे, खिचडी आदींचे सेवन दुधासोबत करू नका. जर या पदार्थासोबत तुम्ही दुधाचे सेवन केल्याने अनेक आजार होऊ शकतात.
तुम्ही रोज धान्य खातात तर कधी कधी त्यासोबत फळे ही खातो. आयुर्वेदानुसार फळे आणि साबुदाणासोबत अन्नधान्य खाणे घातक ठरू शकते.
प्रथिनेयुक्त अन्न
उन्हाळ्यात दही खाणे चांगले. कारण पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पण त्यासोबत खाल्लेल्या गोष्टी खाल्ल्यास पोट खराब होऊ शकते. जसे की, बीन्स, चीज, गरम पेय, लिंबूवर्गीय फळे, आंबा, अंडी आणि मासे दह्यासोबत खाऊ नयेत.
बटाटे, टोमॅटो, वांगी, शिमला मिरची असे पदार्थ काकडी, खरबूज, दूध-चीज इत्यादी गोष्टी खाणे टाळा. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका आहे. ( Disclaimer : वर देण्यात आलेल्या गोष्टी केवळ सामान्य माहिती प्रदान करतात. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. झी 24 तास या गोष्टींची पुष्टी करत नाही. )