पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात रिझर्व्हेशन कॉऊंटरजवळ जिलेटीनच्या 3 काड्या मिळाल्याने खळबळ मोठी उडाली. पोलिसांना ही बाब कळताच त्यांनी तातडीने प्लॅटफॉ़र्म क्रमांक 1 आणि 2 रिकामा केला. तसेच परिसरातून प्रवाशांना तातडीने दूर जाण्याच्या सूचना दिल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे स्टेशनवर जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने पोलिसांनी तातडीने ऍक्शन घेत रेल्वेची वाहतूकही थांबवली. ससून रुग्णालयाच्या मागच्या मैदानावर या जिलेटीनच्या कांड्यांचा बॉक्स नेण्यात आला. तेथे बॉम्ब नष्ट करणाऱ्या पथकाकडून या कांड्या नष्ट करण्याचे काम सुरू आहे...


बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याने पथकाने निकामी केली. त्यानंतर न्याय वैद्यकीय लॅबमध्ये पाठवले जाणार आहे. या वस्तू मध्ये थोडेफार  स्फोटक असणारी दारू सापडली असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद यांनी दिली.