चंद्रकांत पाटीलांचा पुन्हा इशारा! फडणवीस आज आणखी एक राजकीय बॉम्ब टाकणार...
Chandrakant Patil | विरोधी पक्षनेते महाविकास आघाडीचे एकापाठोपाठ प्रकरणे बाहेर काढत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आजच्या अधिवेशनाच्या सत्रात फडणवीस आणखी राजकीय बॉम्ब टाकणार का याकडे सर्वांच लक्ष आहे.
पुणे : आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणखी एक राजकीय बॉम्ब टाकणार असल्याचं सुतोवाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. त्यामुळे फडणवीस काय बोलतात..कोणाला टार्गेट करतायत याकडे सा-यांचं लक्ष लागलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भांडाफोड केलेल्या सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या स्ट्रिंग ऑपरेशन व्हिडीओमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आज अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री याप्रकरणी निवेदन देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या व्हिडीओंची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. व्हिडीओमुळे सध्यातरी महाविकास आघाडी बॅकफुटवर असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गृहमंत्री फडणवीसांच्या व्हिडीओबॉम्बवर काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी काल पुन्हा सुतोवाच केले की, फडणवीस उद्या (14 मार्च)ला पुन्हा राजकीय बॉम्ब टाकणार. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते अलर्टवर आहेत. आज अधिवेशनात फडणवीस कोणाला टार्गेट करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.