मुंबई : इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या सामान्य जनतेला पुन्हा एकदा नव्या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. एमएमआर म्हणजेच मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सीएनजी प्रति किलो 5 रुपयांनी, तर PNG साडेचार रुपयांनी महागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महानगर गॅस लिमिटेडने ही दरवाढ जाहीर केलीय. या नव्या दरवाढीमुळे सीएनजीचा दर किलोमागे 72 रुपये झाला आहे तर घरगुती पाईप म्हणजे PNG चा दर आता किलोमागे 45.50 रुपये इतका झाला.


1 एप्रिलला राज्य सरकारनं नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये कपात केली होती. मात्र सलग दोन वेळा झालेल्या दरवाढीनं सीएनजी, पीएनजीचे दर पुन्हा एकदा मूळ किमतीवर पोहोचलेत.


त्यामुळे राज्य सरकारनं केलेल्या व्हॅट कपातीचा ग्राहकांना फायदा झालाच नसल्याचं स्पष्ट झालंय. या दरवाढीमुळे आता टॅक्सी, रिक्षाची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.


पुण्यातही दरवाढ


सीएनजीचे दर मध्यरात्रीपासून पुणे शहरात 68/ Rs per kh, रुपये प्रति किलोवरून 73/rs per kg, रुपये वाढले 


पुण्यातही सीएनजी गॅस महागला


या प्रचंड वाढीचे मुख्य कारण म्हणजे सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट आयातित वायूच्या वाढीमुळे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या विशिष्ट गॅसची आंतरराष्ट्रीय किंमत दुप्पट झाली आहे.