Loksabha Elections 2019 : पुणे काँग्रेसकडून मोहन जोशी निवडणुकीच्या रिंगणात
काँग्रेसच्या वतीने नेमकं कोण निवडणूक लढवणार याविषची उत्सुकता शिगेला पोहोचली होती
पुणे : Loksabha Elections 2019 आगामी लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्यासाठी अखेर पुण्यात काँग्रेसला उमेदवार सापडला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून पुण्यातून काँग्रेसच्या वतीने नेमकं कोण निवडणूक लढवणार याविषची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ज्या धर्तीवर निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच आता मोहन जोशी यांच्या नावे उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षनिष्ठतेला महत्त्वं देत जोशी यांना काँग्रेसचे उमेदवार ठरवण्यात आलं आहे. काँग्रेसकडून एकूण नऊ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्याच्या या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारक यांचा दबाव झुगारून लावण्यात आला आहे ही बाब तितकीच महत्त्वाची. रावेरची जागा सोडण्याच्या बदल्यात पुण्यातून प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी द्यायचा आग्रह राष्ट्रवादीकडून धरण्यात आला होता. सुरुवातीला काँग्रेस या दजबावाला बळी बडत असल्याचं चित्र होतं. प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खरा. पण, सर्वदूर उमटणाऱ्या याविषयीच्या प्रतिक्रिया पाहता काँग्रेसने उमेदवाराची घोषणा टाळली होती.
अखेर सावध होत मोहन जोशी यांच्या नावे काँग्रेसची उमेदवारी सोपवण्यात आली. त्यामुळे शरद पवार यांच्या दबावाला काँग्रेस नेत्यानी एकजुटीने विरोध केल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्या विरोधात लढण्यासाठी उल्हास पाटील सज्ज असल्याचं कळत आहे. त्यामुळे रावेर मतदार संघाकडे अनेकांचच लक्ष लागलेलं असेल.