पुणे : पाकिस्तान आणि चीन भारताविरोधात नेहमीच कुरापती करत आलेत. मात्र आता या देशांकडून भारताला जैविक हल्ल्याचा धोका आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याबाबत एक मोठं वक्तव्य केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे सीमेवर चीन, पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती. त्यात आता एका नव्या संकटाची चाहूल लागलीय. येत्या काळात भारताला जैविक हल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेत.


जैविक हत्यारांच्या निर्मितीसाठी खतरनाक व्हायरस तयार केला जातोय. याचा मुकाबला करण्यासाठी भारताला नवी रणनीती तयार करावी लागेल असं डोवाल यांनी म्हंटलंय.


अजित डोवाल यांचा रोख सरळसरळ चीनकडे आहे. आधीच कोरोनामुळे जगाच्या नजरेत चीन आरोपीच्या पिंज-यात आहे.


अशातही चीनच्या वेगवेगळ्या लॅबमध्ये जैविक हल्ल्यांसाठी विषाणू बनवले जात असल्याचं वृत्त याआधीही समोर आलंय. त्यामुळे भारतानं वेळीच सावध राहायला हवं. कारण भविष्यातलं युद्ध हे शस्त्रांचं नसेल तर ते जैविक युद्ध असेल.