Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा उलटफेर, गतविजेता पृथ्वीराज पाटीलचा पराभव!
महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये (Maharashtra Kesari 2023) मोठा उलटफेर, पुण्याच्या हर्षद कोकाटेने (Harshad Kokate) पृथ्वीराज पाटीलवर मात केली.
Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये (Maharashtra Kesari 2023) मोठा उलटफेर झालेला पाहायला मिळाला आहे. गतविजेता पृथ्वीराज पाटील ( Prithviraj Patil Maharashtra Kesari 2023) याचा पराभव झाला आहे. पुण्याच्या हर्षद कोकाटेने (Harshad Kokate) पृथ्वीराज पाटीलवर मात केली. दोन्ही मल्लांनी आपली ताकद पणाला लावली होती. हर्षद कोकाटेने शक्ती आणि युक्तीची सांगड घालत विजय साकार केला. (Defeat Harshad kokate of defending champion Prithviraj Patil in Maharashtra Kesari competition Maharashtra Kesari 2023 latets marathi News)
पृथ्वीराज पाटील गतविजेता असल्यामुळे त्याची कुस्ती पाहण्याची यंदा सर्वांना उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र केसरीची गदा मिळवणाऱ्या पाटीलचा आत्मविश्वास दुणावला होता. कुस्ती सुरू झाल्यावर पहिली फेरी अटीतटीची झाली पहिली फेरी 4-3 ने संपली. हर्षदकडे एक गुणाची आघाडी होती.
दुसऱ्या फेरीमध्ये हर्षदने मोठी भक्कम आघाडी घेतली. पृथ्वीराज त्याची संपूर्ण ताकद पणाला लावत होता. मात्र हर्षद कोकाटे ताकतीने आणि उंचीनेही मोठा गडी दिसत होता. त्याने भक्कम आघाडी घेतल्यावर पृथ्वीराजला एकही गुण गेऊ दिला नाही. उलट गुण मिळवण्यासाठी पाटीलने आक्रमण करताना टाकलेले एकेरी आणि दुहेरी पट थोपवून लावले. त्यामधून स्वत: गुणांची कमाई केली.
दरम्यान, हर्षद कोकाटेने अखेरपर्यंत आपली गुणांची आघाडी तशीच ठेवली. दुसऱ्या फेरीमध्ये त्याने गतविजेत्या पृथ्वीराजला एकही गुण मिळवून दिला नाही. आक्रमण थोपवून लावताना त्याने दुसऱ्या फेरीत 5 गुणांची कमाई केली. दोन्ही फेऱ्यांच्या अखेर हर्षदने पृथ्वीराजवर 9-3 ने विजय मिळवला.
पहिली फेरी 3 मिनिट
हर्षद (माऊली) कोकाटे 4 गुण
पृथ्वीराज पाटील 3 गुण
दुसरी फेरी 3 मिनिट
हर्षद (माऊली) कोकाटे 5 गुण
पृथ्वीराज पाटील 0 गुण
निकाल 9-3 ने हर्षद (माऊली) कोकाटे विजयी