What Is Bubonic Plague in Marathi : गेल्या वर्षभरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती.  कोरोनाच्या संसर्गपासून सुटका होत असताना ब्युबोनिक प्लगेला सुरुवात झाली. या आजारामुळे जगातील कोट्यावधी लोकांचा मृत्यू होऊन चीनमध्ये 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा हा आजार चर्चेत आला आहे. याला काळा मृत्यू असेही म्हणतात. या आजाराचे नाव ब्यूबॉनिक प्लेग आहे. तसेच 1896 मध्ये पुण्यात या प्लेगची साथ आली होती. यामुळे अक्षरशः खळबळ उडाली होती. 1897 मध्ये पुण्यात संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुबोनिक प्लेग हा जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो. या संसर्ग घातक ठरू शकतो. उपचारासाठी फक्त प्रतिजैविके उपलब्ध आहेत. तिसऱ्या पातळीवरील इशारा जाहीर करण्यात आल्यानंतर प्लेगचा फैलाव करणाऱ्या प्राण्यांच्या खाण्यावर बंदी घातली जाते. त्याशिवाय लक्षणे आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले जातात.  बुबोनिक प्लेगची प्रकरणे जगभर आढळतात. 2017 मध्ये, मादागास्करमध्ये बुबोनिक प्लेगची आणखी 300 प्रकरणे आढळली होती..


बुबोनिक प्लेग म्हणजे काय?


बुबोनिक प्लेग हा येर्सिनिया पेस्टिस या बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. हा संसर्ग प्राणी आणि मानवांमध्ये होतो. यर्सिनिया पेस्टिस सामान्यतः लहान प्राण्यांच्या शरीरावर आढळणाऱ्या पिसवांनी दंश केल्यामुळे पसरतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, हे तीन प्रकारे मानवांमध्ये प्रसारित केले जाऊ शकते. हा रोग संक्रमित व्हेक्टर डास चावल्यामुळे, संक्रमित डासांच्या संपर्कात आल्याने (जसे की संक्रमित उंदरी चावल्यामुळे) आणि न्यूमोनिक प्लेग असलेल्या रुग्णामध्ये श्वसनमार्गाद्वारे जीवाणू आत  गेल्याने हा आजार होऊ शकतो. 


बुबोनिक प्लेगची लक्षणे काय आहेत?


विशेषत: बुबोनिक प्लेगमध्ये, बॅक्टेरिया लिम्फ वाहिन्यांच्या लिम्फ नोड्समध्ये प्रवेश करतात. युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या मते, अचानक ताप येणे आणि थंडी वाजणे, डोकेदुखी आणि अंगदुखी, मांडी, मान, खांद्यामध्ये दुखणे, थकवा आणि अशक्तपणा, मळमळ आणि उलटी, रक्तामध्ये विष पसरणे त्यामुळे व्यक्ती धक्क्यामध्ये जाण्याची शक्यता, खोकला, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे आहेत. साधारणपणे हा रोग संक्रमित डास चावल्यामुळे होतो. मृत्यू दर 30 ते 60 टक्के आहे. जीवाणू रक्तप्रवाहातून शिरले तर या आजाराचा पुढचा टप्पा म्हणजेच सेप्टिसेमिक प्लेग होतो. यामध्ये ओटीपोटात दुखणे, झटका लागणे, त्वचेतून रक्तस्त्राव , बोटं आणि नाकांची त्वचा काळी पडणे यांसारखे गंभीर लक्षणे आढळतात. सीडीसीच्या मते, सेप्टिसेमिक प्लेग, ज्याला प्लेग देखील म्हणतात, डास चावल्यामुळे या संक्रमित प्राण्याच्या संपर्कात आल्याने होऊ शकतो.