सुट्टीच्या हंगामात पुण्याचा सिंहगड किल्ला आणि खडकवासला धरण पर्यटकांसाठी बंद; पण कारण काय?
संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण चौपाटी आणि सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पर्यटक नाराज झाले आहेत.
Pune News : सध्या सुट्टचा हंगाम सुरु आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्ताने अनेक जण सहलींचा बेत आखत आहेत. तुम्ही जर पुण्यात फिरायला जाण्याचे प्लानिंग करत असाल तर ही बतामी तुमच्या कामाची आहे. तुम्ही पुण्याचा सिंहगड किल्ला (sinhagad fort) आणि खडकवासला धरण (khadakwasala dam) पहायला जाण्याचा बेत आखत असाल तर तो रद्द करा. कारण, सिंहगड किल्ला आणि खडकवासला धरण पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
खडकवासला धरण चौपाटी व सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सोमवारी (15 मे रोजी) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ते डीआयएटी येथे भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण चौपाटी आणि सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
किती वेळासाठी खडकवासला धरण चौपाटी व सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद
सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत ही दोन्हीही ठिकाणे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद असणार आहेत. हवेली पोलीस व वन विभागाने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.
पर्यटक नाराज
कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक ही कार्यवाही करण्यात आल्याने पर्यटक मात्र तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. खडकवासला धरणाला लागून असलेल्या उन्नत प्राद्योगिक संरक्षण संस्था (डीआयएटी) येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा दौरा आहे. रविवारच्या सुट्टीमुळे खडकवासला व सिंहगड या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात व परिणामी सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून खडकवासला चौपाटी व सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
आमदार निलेश लंके भर उन्हात रस्त्यावर उतरले
पुणे नाशिक आणि नगर कल्याण या दोन महामार्गाना जोडणा-या आळेफाटा चौकात मोठी वाहतुक कोंडी झासली होती. ही वाहतुक कोंडी काढण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके भर उन्हात रस्त्यावर उतरले होते. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तब्बल पाच तास दोन्ही महामार्गावर वाहतुककोंडी झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अशात आळेफाटा चौकातल्या वाहतुक कोंडीच्या कडाक्याच्या उन्हात तासांतास प्रवाशांसह स्थानिक नागरिक त्रस्त झाले. या मार्गावरुन प्रवास करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके देखील या वाहतुक कोंडूत अडकले होते. स्वत: रस्त्यावर उतरुन त्यांनी वाहतुक कोंडी सोडविण्यात प्रयत्न केला.