Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्रातील मानाची कुस्ती स्पर्धा 'महाराष्ट्र केसरी 2023' ची (Maharashtra Kesari 2023) गदा मिळवण्यासाठी नामांकित मल्लांच्या थरारक कुस्त्या होत आहेत. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत वर्षभर केलेली मेहनत पणाला लावताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे दोन मोठे मल्ल ज्ञानेश्वर जमदाडे आणि सिकंदर शेख (Sikander Sheikh vs Mauli Jamdade) यांच्यात डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती पाहायला मिळाली. कोल्हापूरमधील गंगावेश तालमीमधील वस्ताद विश्वास हरगुलेंचे दोन्ही पठ्ठे एकमेकांशी भिडले. (Maharashtra Kesari 2023 Sikander Sheikh vs Mauli Jamdade kusti reslut latets marathi News


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोथरूडमधील (Kothrud) कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी 32 एकरमध्ये 80 हजार आसनक्षमतेचे मैदान साकारण्यात आलं होतं. माती विभागात खेळणारे दोन्ही पैलवान एकमेकांचे खास जिगरी दोस्त आखाड्यात उतरले होते. कुस्ती चुरशीची होणार हे सर्वांनाच माहित होतं त्यामुळे मैदान अगदी खचाखच भरलं होतं. काय लागला कुस्तीचा निकाल? 


चपळ चिते असणाऱ्या दोन्ही पैलवानांना एकमेकांचा खेळ माहित होता. पहिल्या फेरीला सुरूवात झाल्यावर दोघांनीही एकमेकांना आक्रमण करण्याची आणि पकड मिळवून देण्याची संधी मिळवून दिली नाही. सिकंदरने गुणांचं खातं उघडत आघाडी घेतली होती मात्र साडे सहा फुटाच्या माऊली जमदाडेने सिकंदरची आघाडी फार वेळ टिकू दिली नाही. त्यानेही 4 गुण घेत आघाडी घेतली. पहिली फेरी संपली तेव्हा माऊलीचे 4 गुण आणि सिकंदरचे 2 गुण झाले होते. 


 



दुसऱ्या फेरीमध्ये सिकंदरने आक्रमक खेळ करत माऊलीवर पकड मिळवली. तेव्हा 2 गुण त्यानंतर सिकंदरने आकडी डाव टाकत आणखी 2 गुण मिळवले. दुसऱ्या फेरी अखेर सिकंदरकडे तब्बल 5 गुणांची भक्कम आघाडी होती. शेवटी सावध खेळ करत या अटीतटीच्या सामन्यात सिकंदर शेखने विजय मिळवला.


पहिली फेरी 3 मिनिट 
सिकंदर शेख 2  गुण
माऊली जमदाडे 4 गुण


दुसरी फेरी 3 मिनिट
सिकंदर शेख 7 गुण
माऊली जमदाडे 0 गुण
निकाल 9-4 ने सिकंदर शेख विजयी