पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव पुन्हा एकदा राजगड करावे आणि मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे स्टेशनला कार्ला येथील एकवीरा देवीचे नाव देण्यात यावे, अशा आशयाचे नाव बदलाचे दोन स्वतंत्र ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सोमवारी (ता.२२) झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे दोन्ही ठराव पुढील मंजुरीसाठी अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात येतील, अशी घोषणा जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी यावेळी सभागृहात केली.


वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्याबाबतचा ठराव उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी मांडला. राजा शिवाजी ग्रामीण विकास मंडळाने याबाबतची मागणी शिवतरे यांच्याकडे केली होती. 


सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी या ठरावास एकमुखी पाठिंबा दिला. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर केला. 


वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे व दिनकर धरपाळे यांनी हा ठराव मंजूर केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले.