पुणे : अत्याचाराच्या घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. अवघ्या 11 वर्षाच्या मुलीचं नात्यातील लोकांनीच तब्बल चार-पाच वर्षे शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या रोखण्यासाठी 'शक्ती कायदा' विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. अत्याचाराच्या घटना पाहता या कायद्यात तीन वेळा दुरूस्ती करण्यात आली होती. परंतू अद्यापही राज्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सुरूच असल्याचे दिसून येत आहेत. 


पुण्यात असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या नात्यातील लोकांनीच तिच शोषण केलं असल्याची माहिती मिळतेय. 


मागील चार ते पाच वर्षे हा प्रकार सुरु होता. याप्रकरणी ठाण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये पीडित मुलीचे वडील, भाऊ, मामा तसेच आजोबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुलीने याबाबत आपल्या मैत्रीणींना सांगितले होते. त्यानंतर मुस्कान या संस्थेकडून शाळेत 'गुड टच बॅड टच' बाबत समुपदेशन घेण्यात आले. त्या समुपदेशनामध्ये पीडित मुलीने आपल्या शोषणाबाबत सांगितले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये नातलगांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.