Pune Metro : पुणे मेट्रोवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. याला कारण आहे ते म्हणजे, मेट्रो भाड्यानं देण्याची जाहिरात. वाढदिवस, गेट टुगेदर आणि इतर सेलिब्रेशन्ससाठी पुणे मेट्रोनं भाड्याने देण्याचा निर्णय मेट्रो व्यवस्थापनानं घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

100 प्रवाशांसाठी पाच हजार, 100 ते 150 प्रवाशांसाठी 7 हजार 500 आणि 150 ते 200 जणांसाठी 10 हजार रूपये शुल्क आकरण्यात येईल अशी जोरदार जाहिरात मेट्रो व्यवस्थापनाकडून सुरू आहे. 


पुणे मेट्रो व्यवस्थापनाच्या जाहिरातीवरून पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मेट्रो प्रवाशांसाठी आहे की वाढदिवस, फॅशन शोसाठी असा सवाल पुणेकरांमधून केला जातोय. अधिवेशनातही याचे तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. 



पुण्यात वाहतुकीचा प्रश्न जटील बनलाय. त्यावर उपाय म्हणून रखडलेले मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे हे प्रकल्प मार्गी लागू शकलेले नाहीत. दुसरीकडे सुरू झालेली मेट्रो ही अत्यंत कमी अंतराची असल्यानं उत्पन्नासाठी मेट्रो व्यवस्थापनाला वाढदिवस, शाळकरी मुलांच्या सहली, फॅशन शो, गेट टू गेदरसाठी मेट्रो भाड्यानं द्यावी लागतेय. त्यामुळे पुणेकरांची संपूर्ण मेट्रोची प्रतीक्षा कधी संपणार आणि ती प्रवाशांची कधी होणार हाच खरा सवाल आहे.