सावधान! अशी होऊ शकते तुमची फसवणूक, महिलेला लाखो रुपयांचा गंडा
पुण्यात एका सुशिक्षित महिलेची फसवणूक झाली आहे. या महिलेला सायबर चोरट्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल 79 लाख रुपयांना गंडवलं आहे.
पुणे, सागर आव्हाड, झी 24 तास: पुण्यात (pune) एका सुशिक्षित महिलेची फसवणूक झाली आहे. या महिलेला सायबर चोरट्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल 79 लाख रुपयांना गंडवलं आहे. या महिलेची फसवणूक मागच्या तीन महिन्यांपासून सुरु होती. जेव्हा या महिलेचे डोळे उघडले तेव्हा तिने गाठलं थेठ पुण्यातलं सायबर पोलिस स्टेशन (pune Cyber Police station) आणि सुरु झाला तपास.
कसा घडला गुन्हा?
तक्रारदार महिला पुण्यात वास्तव्याला होती. व्यावसाय रिअल इंटेस्ट एजंटचा होता. महिलेची महिन्याची कमाई देखील मोठी होती. भरपूर पैसा असल्यामुळं कुठे तरी पैसा गुंतवण्याचं चक्र महिलेच्या डोक्यात फिरु लागलं. पैसा गुंतवल्यावर कमाईत आणखी वाढेल असा विश्वास महिलाचा होता.
असं म्हणतात जास्त पैसा कुणाला नको? दरम्याच्या काळात या महिलेची ओळख गौरव निकम, राहुल शिंदे आणि राहुल मॅथ्यू या तिघांसोबत झाली. ही ओळख ऑनलाईन होती. प्रत्यक्षात हे कधी भेटलेच नाहीत. महिलेकडे बक्कळ पैसे आहेत. महिलेला पैसे गुंतवायचे आहेत. असं या चोरट्यांच्या लक्षात आलं. मग या चोरट्यांनी सफाईदारपणे आपलं जाळं विणलं. "आपण तुम्हाला KFC या नामांकित हॉटेलची फ्राँचाईजी देऊ" असं सांगितलं. या बातावणीवर महिलेचा विश्वास बसला. या चोरट्यांनी तक्ररादार महिलेला KFC ची खोटी कागदपत्र दाखवली. त्यानंतर एक खोटी वेबसाईट देखील दाखवली. कागदपत्र आणि वेबसाईट पाहून महिलेचा चोरट्यांवर विश्वास अधिक पक्का झाला. मग चोरट्यांनी महिलेकडे पैशांची मागणी केली. यासाठी या तिघांनी चार बँक खात्यांचे नंबर सुद्धा दिले. आपण आता व्यावसायिक होणार या भ्रमात या महिलेनं 79 लाख 76 हजार रुपये या चार बँक खात्यात टाकले. पैसे दिल्यानंतर महिलेनं या चोरट्यांशी संपर्क साधला पण ज्यानंबर वरुन फोन येत होते ते नंबर आता बंद झाले होते. महिलेच्या लक्षात आलं की काही तरी मोठी गडबड झाली आहे. हातोहात आपल्याला 79 लाख रुपयांचा चुना लागला आहे.
महिलेनं कपाळावर हात मारला आणि गाठलं ते थेट पुण्यातलं सायबर पोलीस स्टेशन.
सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालाय. आरोपी फरार आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर सावध होणं गरजेचं आहे. कारण कमवण्यासाठी खूप वेळ लागतो पण गमवण्यासाठी काही सेकंद पुरेसे असतात. म्हणून ऑनलाईन व्यवहार करताना सावधानी बाळगणं गरजेचं.
Cyber Crime, Cyber Loot, Cyber Cheating, Fraud happened with a woman in Pune, KFC
pune women dupped on the name of KFC franchise for more than 79 lakhs