पुणे : टिळक स्मारक ट्रस्ट कडून दरवर्षी लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पुरस्कार दिला जातो. दरवर्षी या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित असतात. मात्र यावर्षी या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करण्यात आले आहेत. ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यावरून पुण्याच्या राजकारणात रोहित टिळक भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच रोहित टिळक यांनी त्यांच्या प्रदेश कार्यकारिणी पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये एका व्यक्तीकडे दहा वर्षापेक्षा जास्त काळ पद नको हे धोरण ठरवण्यात आले. त्यानुसार त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.


त्यानंतरच रोहित टिळक यांनी भाजपात जाण्याचे ठरवले असल्याचे बोलले जात होते.. त्यानंतर त्यांनी आता त्यांच्या घरच्या कार्यक्रमाला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण केल्याने त्यांच्या या चर्चेला पुष्टी मिळत आहे.