सागर आव्हाड, पुणे :  शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक केली आहे. (TET Exam Fraud)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य विभाग, म्हाडा तसेच शिक्षक भरती परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आतापर्यंत टीईटी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांच्या साखळीतील अटक केलेल्या आरोपींची संख्या पाच वर पोहचली 



प्रकरणाची पाळेमुळे खोलवर जाण्याचे संकेत पोलिसांनी दिले होते, त्यानुसार डेरे याला अटक करण्यात आली .


त्याच्याकडून आणखी माहिती हाती लागल्यानंतर प्रकरणाची व्याप्ती उघडकीस येण्यास मदत होणार आहे.(TET Exam scam)


TET Exam scam: राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित


मुंबई : TET Exam scam: टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी मुख्य  राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आरोपी तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आले आहे. सुपे यांच्या घरात 2 कोटींची रोकड आणि दागिने सापडेल आहेत. तसेच घोटाळ्याच्या चौकशीसाठी 6 अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती आता 15 दिवसात अहवाल  देणार आहे. (Maharashtra State Examination Council Commissioner Tukaram Supe suspended)


शासनाने महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.


तसेच टीईटी परीक्षेतल्या गैर प्रकाराची चौकशी करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. शालेय शिक्षक विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांसह शिक्षण आयुक्तांचाही समावेश करण्यात आला आहे.


प्राथमिक अहवाल सात दिवसांच्या आत तर सविस्तर अहवाल 15 दिवसांत देण्याचे आदेशही या समितीला देण्यात आले आहेत.  


हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत सुपे हे पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.


निलंबित असताना सुपे यांनी खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खासगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार कारवाईस पात्र ठरतील, असेही निलंबनच्या आदेशात म्हटले आहे.


2019-2020 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (TET) केलेल्या गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना दि.16 डिसेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली आहे.


सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून 48 तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत.