Black Magic in Pune: काळ्या रंगाच्या बाहुल्या.. लिंबू, सुया, हळदी कुंकू अन् काही लोकांचे फोटो.. अशी दृश्य आहेत पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीतली.. पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत चक्क काळी जादू करण्याचा अघोरी प्रकार घडला.. धक्कादायक म्हणजे चितेजवळ दोन तृतीयपंथीयांनी हे अघोरी कृत्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी मध्यरात्री वैकुंठ स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही तासात लक्ष्मी शिंदे आणि मनोज धुमाळे हे तृतीयपंथी चितेजळ आले आणि त्यांनी चितेजवळ काळी जादू करायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने पाहिला आणि पोलिसांकडे तक्रार केली. 


विश्रामबाग पोलीस तातडीने घटनास्थळी आले आणि दोघा तृतीयपंथीयांना रंगेहाथ पकडलं. दोन्ही आरोपींविरोधात नरबळी, अमानुष अघोरी, काळी जादू केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.



एकीकडे जग चंद्रावर वसाहत बनवण्याची तयारी करतंय. तर दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही काळीजादू, नरबळी अशी अघोरी कृत्य केली जात असल्याचं वारंवार समोर येतय. धक्कादायक म्हणजे विद्येचं माहेरघर आणि  सांस्कृतिक राजधानी असणा-या पुण्यात हा सगळा प्रकार घडणं हे चिंताजनक आहे. पण स्मशानातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या कृष्णकृत्याचा वेळीच पर्दाफाश झालाय. त्यामुळे तुम्हीही सतर्क राहा.. अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका..