पुण्यात 2 व्हायरसचा सुळसुळाट; झिकासह जॅपनीज इन्सेफेलायटीसचा रुग्ण आढळला
जगात धुमाकूळ घालणाऱ्या झिका (Zika Virus) व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात (Pune) सापडलाय तर शहरात पहिल्यांदाच जॅपनीज इन्सेफेलायटीसचा (Japanese encephalitis) रुग्णही सापडलाय.
Zika Virus : महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona) पहिला रुग्ण पुण्यात सापडला होता. त्यानंतर कोरोना राज्यात पसरला होता. कोरोनाचा कहर कमी होत असतानाच आता पुण्यात दोन नव्या खतरनाक व्हायरसची (Virus) एंट्री झालीय. जगात धुमाकूळ घालणाऱ्या झिका (Zika Virus) व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात (Pune) सापडलाय तर शहरात पहिल्यांदाच जॅपनीज इन्सेफेलायटीसचा (Japanese encephalitis) रुग्णही सापडलाय.
वावधन परिसरातल्या एका 67 वर्षीय रुग्णाला झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्याच्यावर जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे महापालिकेसाठी राज्य आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर गेल्यात.. झिका व्हायरस खतरनाक का आहे पाहुयात..
काय आहे झिका आजार?
झिका हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. या आजारात 80% रुग्णांमध्ये लक्षणं आढळत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे ही लक्षणं आढळलात. झिका आजार संसर्गजन्य नाही.
या आजारापासून कसा करावा बचाव
आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी
पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीनं व्यवस्थित झाकून ठेवावं
घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी
घराच्या भोवती, छतावर टाकाऊ साहित्य ठेवू नका.
पण फक्त झिकानं पुणेकरांची चिंता वाढवलेली नाही. पुण्यात पहिल्यांदाच जॅपनीज इन्सेफेलायटीसचा रुग्ण आढळून आलाय. वडगाव शेरी इथल्या 4 वर्षांच्या मुलाला जेईची लागण झालीय. जेई हा एक प्रकारचा विषाणूजन्य मेंदूला होणारा संसर्ग आहे. त्याला मेंदूज्वर असेही म्हणतात.
काय आहेत आजाराची लक्षणे?
जॅपनीज इन्सेफेलायटीस अर्थात मेंदूज्वर
रुग्णाच्या मेंदूला सूज येते
सोबत ताप आणि डोकेदुखीचा त्रास
1 ते 15 वर्ष वयोगटातील बालकांमध्ये अधिक प्रमाण
डास आणि डुकरांमुळे मेंदूज्वराचा प्रसार
कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला होता. पुण्यातून राज्यात आणि राज्यातून पुण्यामध्ये येजा करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे साथीचे आजार किंवा व्हायरस पसरण्याचा धोकाही मोठा आहे. पण आता दोनदोन खतरनाक व्हायरस पुण्यात सापडल्यानं आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर गेलीये.