15 Sleeping Positions जोडप्यामधील प्रेम आणखी वाढवतात; रोमान्स होईल आणखी खास
बेडरुमधील रोमान्स अधिक रोमँटिक करायचा असेल तर या 15 Sleeping Positions नक्की ट्राय करा.
Sleeping Positions : जोडप्यामधील लैंगीक संबध अर्थात सेक्स हे प्रजनन वाढीसाठी महत्वाचे आहेत. मात्र, एकमेकांसोबतची जवळीक प्रेम आणखी वाढते. नात्यामधील विश्वास आणखी वाढतो. सेक्स करताना रोमान्स हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. यामुळे एकमेकांशी जवळीक साधताना त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेणे अत्यंत गरजेच आहे. यासह नव नवीन प्रयोग करणे देखील नाते संबध अधिक घट्ट करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अशा काही Sleeping Positions आहेत ज्या तुमच्या रोमान्सचा आनंद आणखी वाढवू शकतात.
लैंगिक संबध हे प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत खाजगी क्षण असतो. यामुळे जोडीदाराव्यतीरीक्त याबद्दल दुसऱ्या कुणाशी उघडपणे चर्चा करता येत नाही. लैंगिक संबधातून एक प्रकारचे मानसिक समाधान मिळत असते. मात्र, बऱ्याचदा एकाच Positions मध्ये सेक्स करत राहिल्याने त्याच्यातील इंटरेस्ट कमी होतो. किंवा त्याच त्याच Positions कंटाळवाण्या वाटतात. यामुळे जोडीदाराबद्दलचे आकर्षण कमी होते. अशा स्थितीत या 15 Sleeping Positions तुमच्या सेक्स लाईफ मध्ये नवा ट्विस्ट आणू शकतात.
स्पून ( The Spoon) - अनेकजण ही पोजिशन नेहमी ट्राय करत असतात. यामध्ये कपल एकाच दिशेला तोंड करुन झोपतात.
लूज स्पून (Loose Spoon) - लूज स्पून ही काहीशी स्पून पोजीशन सारखीच आहे. यात फक्त थोडे अंतर राखले जाते.
चेजिंग स्पून (Chasing Spoon) - या पोजिशनमध्ये कपल एकमेकांना मिठीत घेवून झोपण्याचा प्रयत्न करतात.
बॅक टू बॅक टचिंग (Back to Back, Touching) - ही पोजिशन जवळपास सर्व कपल ट्राय करतात. यामध्ये कपल एकमेकांच्या खूपच जवळ असतात.
लेग हग (Leg Hug) - लेग हग ही सर्वात रोमॅंटिक पोजिशन मानली जाते. यात कपल एकमेकांच्या पायात पाय गुंतवुण झोपतात.
क्रॅडल (The Cradle) - क्रैडल ही सर्वात लव्हेबल पोजिशन मानली जाते. यामध्ये कपल एकमेकांना प्रेमाने कुरवाळतात.
टेथर बॉल(Tetherball) - या पोजिशनमध्ये कपल एकमेकांना बिलगून झोपतात. यामध्ये फिजीकल कॉन्टॅक अधिक प्रभावीपणे होतो.
स्टारफिश (Starfish) - यामध्ये कपलपैकी एकजण अत्यंत आरामशीरपणे झोपतो. तर, पार्टरन त्याला बिलगण्याचा प्रयत्न करतो.
बेली (Both Partners on the Stomach) - या पोजिशनमध्ये कपल पोटावर झोपतात. याच पोजिशनमध्ये ते एकमेकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात.
टू फेस टचिंग ( Face to Face, Touching) - ही पोजिशन देखील अत्यंत रोमॅंटिक अशी आहे. कारण जोडपी एकमेकांकडे तोंड करुन झोपतात. यामध्ये ते सहज एकमांचे चुंबन घेवून जवळीक साधू शकतात.
पेपर डॉल्स ( Paper Dolls) - यात कपल एकमेकांचे हात घट्ट पकडून पाठीवर झोपतात. ही सर्वात आरामदायी पोजिशन मानली जाते.
क्लिफ हँंगर ( The Cliffhanger) - यामध्ये फिमेलच्या सोईनुसार मेल जोडीदार तिच्याशी जवळीक साधत असतो. यामध्ये फिमेल बेडवर असेल तर मेल बेडखाली असते.
सिंगल्स (The Shingles) - या पोजिशनमध्ये कपल त्यांच्या सोईनुसार जवळीक साधण्याचा प्रयत्न करत एकेमकांना प्रतिसाद देत असतात.
टँगल (The Tangle) - या पोजिशनमध्ये बेडवर झोपून नाही तर बसून एकमेकांशी जवळीक साधली जाते.
ऑन-टॉप ऑफ यू (The On-Top of You) - ऑन-टॉप ऑफ यू ही पोजिशन अत्यंत खास मानली जाते. यामध्ये एकजण झोपलेला असतो. तर, दुसरा पार्टनर बसलेल्या पोजिशनमध्ये असतो.