मुंबई : जेव्हा एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते तर तिला मिळवण्यासाठी मुलगा काहीही करण्यास तयार असतो. यासाठी अनेकदा खोटे बोलायचे असेल तर तेही करण्यास मुले तयार असतात. अनेकदा मुलींना इंप्रेस करण्यासाठी मुलं बरंच काही करतात. काही मुले तर मुलींना इंप्रेस करायला इतक्या मोठ्या बढाया मारतात की विचारुच नका. मात्र बढाया मारुन प्रेम मिळत नसते. तुम्हाला ती मुलगी खरंच आवडत असेल तर ते तिला स्पष्टपणे सांगा. तसेच याबाबतीत तिच्या मताचाही आदर करा. तुम्हाला ती आवडत असेल याचा अर्थ तिलाही तुम्ही आवडलाच पाहिजे असे नाही. त्यामुळे तिचेही मत याबाबत विचारात घ्या. जाणून घ्या मुलींना इंप्रेस करण्याच्या नादात मुले या ७ गोष्टी खोटं बोलतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीच्या बोलण्यामध्ये अनेकदा मुले-मुले आवड-नावड याबाबतीत बोलतात. एकदा पसंत-नापसंत जाणून घेतल्यानंतर मुलींना आवडणाऱ्या गोष्टी आपल्यालाही आवडतात असे मुले अनेकदा सांगतात.


काही मुलांना आपला भूतकाळ शेअर करायला आवडत नाही. ते आपल्या जुन्या गर्लफ्रेंडबाबत बऱ्याचदा खोटी माहिती देतात.


फिटनेसबाबत अनेक मुलांना मुलींसमोर इंप्रेस करण्यासाठी बढाया मारण्याची सवय असते. मी इतक्या मिनिटांत इतक्या पुश अप्स मारतो असे आण बरेच काही...


काही मुलांना पगारापेक्षा जास्त खर्च दाखवण्याची सवय असते. आपल्या कुटुंबाच्या स्टेटसबाबत अनेक मुलांना बढाया मारुन सांगण्याची सवय असते.


सुरुवातीला मुले मुलींचे फ्रेंडस आवडत असल्याचे दाखवतात.


मुले जरी मुलींची सतत आठवण काढत नसतील मात्र त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणतात, तुझ्यात आठवणीत रमलो होतो.


काही मुले सुरुवातीला फेमिनिस्ट असल्याचे दाखवतात. त्यांना याचा अर्थही बऱ्याचदा माहीत नसतो. मात्र कूल असल्याचे दाखवण्यासाठी मुले असे काहीतरी दाखवतात.