मुंबई : नवरा बायको म्हटलं की, प्रेम भांडण-तंटे, रुसवे-फुगवे, सगळं येतातच. लग्नानंतर नवरा बायकोच्या आयुष्याची नवीन सुरूवात होते. त्यामुळे एकमेकांबद्दल काही गोष्टी त्यांना माहित नसतात, ज्यामुळे एकमेकांना समजून घेण्यापासून ते त्यांचा स्वभाव जाणून घेईपर्यंत सगळ्याच गोष्टींची नव्याने सुरूवात त्यांना करावी लागते. त्याच प्रमाणे काही गोष्टी न पटल्यामुळे नवरा-बायकोमध्ये भांडणे होतात, त्यात तसं फारसं नवीन काही नाही. कारण हे प्रत्येक नवरा-बायको सोबतच घडतं. त्याला आपण पूर्णपणे तर रोखू शकत नाही, परंतु थोडा समजूतदारपणा दाखवून हे घरगुती भांडण टाळता येऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यासाठी बायकोला थोडं संयमाने वागावे लागेल, त्याचबरोबर आपल्याला नवऱ्याला त्याच्या प्रत्येक गोष्टीत मदत करायला तयार राहावे लागेल. काही सामान्य मुद्दे आहेत जे प्रत्येक नवरा-बायकोमध्ये भांडणाचे कारण बनतात. आज आम्ही अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याची काळजी घेतल्याने नवरा-बायकोमधील भांडणे कमी होऊ शकतात.


माहेरची स्तुती टाळा


जेव्हा एखादी मुलगी तिच्या वडिलांचे घर सोडून तिच्या सासरच्या घरी येते, तेव्हा तिला तिच्या माहेरची आठवण येणे सहाजिकच आहे. यामुळे, पत्नी अनेकदा तिच्या पतीसमोर तिच्या माहेरची स्तुती करते. परंतु असे केल्याने, कधीकधी तुम्ही तुमच्या माहेरची तुलना तुमच्या सासरच्या लोकांशी करता. बोलण्या बोलण्यात हे तुम्हाला कळत नाही, परंतु ही गोष्टीमुळे तुमच्या नवऱ्याला राग येऊ शकतो ज्यामुळे भांडणे होतात. ही गोष्ट केवळ पतीसाठीच नाही, तर तुमच्या सासूलाही याचे वाईट वाटू शकते. परंतु तुम्ही स्तूती करणं थांबवल्याने तुमच्या तुम्हाला हे वाद टाळता येऊ शकतात.


नवऱ्याच्या आई-वडिलांविषयी वाईट बोलणे


बऱ्याच वेळा घरात सून, जाणीवपूर्वक किंवा काही वेळेला अजाणतेपणाने, सासू-सासऱ्यांशी वाईट वागते. असे केल्याने कोणत्याही मुलाला वाईट वाटू शकते. जर बायकोला तिच्या सासू-सासऱ्यांशी काही तक्रार असेल, तर तिने त्यांच्यासोबत बसून तो सोडवण्याचा प्रयत्न करावा. तसेच मुलगा आपल्या आईवडिलांशी वाईट वागत असला, तरी बायकोने तसे करु नये कारण नवऱ्याला आपल्या आई-वडिलांना दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने बोलल्याने वाईट वाटू शकते.


नवऱ्याकडे त्याच्या कुटुंबाची तक्रार करु नका


प्रत्येकजण त्याच्या कुटूंबावर आणि भावंडांवर खूप प्रेम करतो. ते एकमेकांशी कितीही भांडले तरी, त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते, त्यामुळे दुसऱ्या कोणत्या व्यक्तिने आपल्या घरातल्यांबद्दल बोलणे तर ते आपण ऐकून घेत नाही, त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या नवऱ्याला त्याच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीची तक्रार करु नका.  तुम्ही असे केलात तर तुमच्या नवऱ्याला याचा त्रास होऊ शकतो.


नवऱ्याची दुसऱ्या व्यक्तीसोबत तुलना करु नका


आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहतो आणि कधीकधी त्यांच्या चांगल्या गोष्टी आपल्याला आवडतात. परंतु बायकोने कधीही तिच्या नवऱ्याची तुलना शेजारच्या इतर पुरुषांशी करू नये. हे करत असताना, तुम्ही तुमच्या नवऱ्याचा अपमान करू शकता, जे तुमच्या नवऱ्याला अजिबात आवडणार नाही.


अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल काही असेल, तर ती तुम्ही बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा. परंतु हे करत असताना कोणाचेही उदाहरण नवऱ्यावा देऊ नका.


महाग वस्तूंची डिमांड करु नका


प्रत्येक मुलीला चांगले कपडे घालण्याची, तसेच चांगले खाण्याची, चांगले आयुष्य जगण्याची इच्छा असते. तुमची प्रत्येक इच्छा सासरच्या घरात लगेच पूर्ण होईलच असे नाही. त्यामुळे पतीकडून महागड्या गोष्टींच्या मागण्या करण्यापूर्वी आधी त्याची आर्थिक स्थिती आणि घराची स्थिती लक्षात घ्या. प्रतिकूल परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या पतीकडून महागड्या मागण्या करता, तर हे पाऊल तुमच्या दोघांचे नाते कमकुवत करू शकते.