मुंबई : नोकरी, घर, लग्न अथवा दुसऱ्या एखाद्या कारणाने अनेकदा आपल्या पार्टनरसोबत राहता येत नाही. दूर राहून नाते सांभाळणे अधिक कठीण होते. अनेकदा दुरावा आल्याने नात्यात एक रिकामेपणा आणि उदासीनता येते. तर अनेकदा गैरसमजही होतात. तुम्ही एकमेकांवर कितीही प्रेम करत असला तरी नात्याला खुलवण्यासाठी काही प्रयत्नांची गरज पडतेच. जर काही गोष्टी अवलंबल्या तर नाते मजबूत बनवणे तितकेसे अवघड ठरणार नाही. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये खालील तीन पद्धतींनी तुम्ही तुमचे नाते अधिक मजबूत बनवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओ कॉल्स, स्काईप कॉल्स, फोन कॉल्स...एक वेळ फिक्स करा ज्यावेळी तुम्ही दोघेही फ्री असाल. तुमच्या पार्टनरशी सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमच्यात दुरावा वाढणार नाही. दोघांनाही एकमेकांच्या आयुष्यात काय सुरु आहे याची माहिती असली पाहिजे.


दूर असलात म्हणून काय झाले टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. जेव्हा तुम्ही व्हिडीओ कॉलवर आहात तर एकत्र काहीतरी रेसिपी बनवा. व्हर्चुअल पद्धतीने काही वेळ एकमेकांसोबत घालवा. 


जर फोनवर बोलण्यास वेळ नाहीये तर मेसेजद्वारे एकमेकांशी संपर्कात राहा. फोटोज, व्हिडीओद वा अन्य काही सतत एकमेकांना पाठवत राहा. आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात त्याला बऱ्या-वाईट वेळेस साथ द्या.