Things Discuss Before Marriage: आयुष्यभराचा जोडीदार निवडत त्याच्यासोबत लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय हा जीवनातील सर्वात मोठा निर्णय ठरतो. लग्नाच्या निमित्तानं फक्त दोन कुटुंबच नव्हे, तर दोन अशा व्यक्ती एकत्र येतात ज्यांना पुढचं आयुष्य एकत्र व्यतीत करायचं असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न Arranged असो किंवा मग Love Marriage; या नव्या आयुष्यात प्रवेश करण्यापूर्वी किंबहुना लग्नापूर्वी जोडीदाराला काही प्रश्न विचारणं केव्हाही फायद्याचं. या प्रश्नांमुळे पुढील जीवनाचा मार्ग सुकर होईल. 


लग्नाविषयीचे विचार- लग्नाआधी जोडीदाराचे या साऱ्याबद्दल नेमके काय विचार आहेत हे लक्षात घ्या. लग्नासाठी समोरच्या व्यक्तीवर कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा दबाव तर नाही हे जाणून घ्या. एकमेकांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत याबाबतही स्पष्टपणे व्यक्त व्हा. 


कुटुंबनियोजन- कुटुंब विस्ताराच्या दृष्टीनं जोडीदाराचा काय विचार आहे, हा प्रश्नसुद्धा लग्नाआधी विचारणं गैर नसेल. या मुद्द्यावर दोघांचंही मत तितकंच महत्त्वाचं ठरतं. 


लग्नानंतर नोकरी- अनेकदा मुलींना लग्नानंतर नोकरी सोडावी लागते. मनाविरुद्ध हा निर्णय घेतला गेल्यामुळं पुढे कुटुंब कलह आणि अनेकदा हे वाद विकोपास जाऊन नातं तुटण्यापर्यंत गोष्टी पुढे जातात. त्यामुळं हे होऊ न देण्यासाठी काही गोष्टी आधीच स्पष्ट करा. परस्पर सामंजस्यानं अशा वेळी योग्य तो निर्णय घ्यावा. इथं जोडीदाराचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. 


सवयींची पूर्वकल्पना- प्रत्येक जोडीदारानं आपल्या जोडीदाराच्या चांगल्या आणि वाईट सवयी आधीच विचारून घेतलेलं सोयीचं ठरेल. अनेकदा अनपेक्षितपणे जोडीदाराच्या सवयी समोर आल्यानंतर मनस्ताप होण्यापेक्षा स्वत:हून काही गोष्टी सांगणं कधीही उत्तम.