मुंबई : नात्यामध्ये छोट्यामोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र अनेकदा अशा रिलेशनशिपमध्ये पाहिले जाते की पुरुष पार्टनर आपल्या महिला पार्टनरशी भावनिक अथवा इतर अन्य बाबतीत चांगले वागत नसले तरी मुली ते नाते टिकवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा मुली आपली चूक नसतानाही हार मानतात आणि रिलेशनशिप टिकवण्याचा प्रयत्न करतात. यामागे मुलींची सकारात्मक मानसिकता असते ज्यामुळे त्या नाते तोडण्यापेक्षा ते अधिक कसे टिकवता येतील यासाठी प्रयत्न करतात. 


जाणून घ्या यामागची कारणे


१. महिला नात्याबाबत खूप सकारात्मक असतात. नात्यात एखादा प्रॉब्लेम आल्यास तो कधीना कधी दूर होईल या आशेवर त्या असतात. याच सकारात्मकतेमुळे त्या नात्याला वाचवण्याचा सतत प्रयत्न करत असतात.


२. मुली प्रामुख्याने तिचा मित्रपरिवार, तसेच घरातल्या लोकांना महत्त्व देतात. त्यामुळे आपल्या नात्यातील कटुपणाचा परिणाम घरातल्या लोकांवर होऊ नये यासाठी त्या सजग असतात. 


३. काही मुली अशा असतात ज्यांना पटकन राग येतो मात्र तितक्याच वेगाने तो निघूनही जातो. अशा मुली नात्यात कितीही कटुपणा आला तरी ते नाते टिकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात. नात्यातील वाईट गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा चांगले प्रसंग आठवत त्या नाते टिकवण्याचा प्रयत्न करतात.