मुंबई : प्रत्येकाला आपल्या नात्याकडून काहीतरी अपेक्षा असतात. जर तुम्हाला वाटते तुमचे नाते नेहमी चिरतरुण रहावे तर तुम्हाला काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. तर काही गोष्टी काळजीपूर्वक टाळल्या पाहिजेत. यामुळेच नात्यात ओलावा तसेच ताजेपणा राहील.  प्रत्येक काम पार्टनरसोबत करणे - तुम्ही जर प्रत्येक गोष्ट तुमच्या पार्टनरसोबत शेअर करत असाल अथवा प्रत्येक काम त्याच्यासोबत करत असाल तर ती चांगली गोष्ट आहे. मात्र हेल्दी रिलेशनशिपसाठी तसेच स्वानुभवासाठी जोडीदाराशिवाय स्वत:हून काही कामे केली पाहिजेत. प्रत्येक वेळेस एकमेकांसोबत राहणे रिलेशनशिपसाठी वाईटही ठरु शकते. यामुळे नात्यातील एक्साइटमेंट कमी होते.


नात्याची सतत तुलना करत राहणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्यांच्या नात्याशी अथवा आपल्या एक्ससोबतच्या नात्याशी सतत तुलना करणे कधीही वाईट. कधीही दोन माणसे सारखी नसतात त्यामुळे तुमच्या नात्याशी इतर नात्याची तुलना करु नये. तुम्ही जो काही विचार करता त्यावर तुमचे नियंत्रण आहे. यासाठी नेहमी सकारात्मक आणि संतुष्ट राहा.


प्रयत्न करणे सोडू नका


अनेकदा नात्यात काही काळ राहिल्यानंतर प्रत्येकासोबत असे घडते की आपण आपल्या जोडीदारासाठी काही खास करणे बंद करतो. नात्यात काही काळ गेल्यानंतर असे घडते मात्र पहिल्या भेटीतील प्रेम आणि अटेंशन देणे बंद करु नये. नेहमी आपल्या पार्टनरला आपल्यासाठी तो किती स्पेशल आहे याची सतत जाणीव करुन दिली पाहिजे.