मुंबई : अनेकांना आपल्याजवळ रुमाल बाळगण्याची सवय असते. नेहमी आपल्यासोबत असणारा रुमाल तुमच्यावर कमी अधिक प्रमाणात चांगला-वाईट प्रभाव टाकत असतो. जर रुमालाशी संबंधित काही गोष्टी पाळल्या नाहीत तर त्या नुकसानकारक ठरु शकतात. रुमालाशी संबंधित या गोष्टी जरुर लक्षात ठेवाव्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकच रुमाल न धुता दररोज वापरु नका. दररोज आपल्यासोबत असणारा रुमाल अनेक प्रकारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वाईब्स निर्माण करतो. यातच तुम्ही रुमाल न धुता त्याचा वापर केल्यास तर निगेटिव्हिटी निर्माण होते.


रुमालावर पेन अथवा पेन्सिलने काही लिहू नये. हे अशुभ मानले जाते. 


कधीही कोणत्याही व्यक्तीला आपला रुमाल देऊ नका. तसेच एखाद्याचा रुमाल आपण वापरु नका. यामुळे नुकसान होऊ शकते.


नेहमी फिक्या रंगाचे रुमाल वापरले पाहिजे. जास्त भडक वा गडद रंगाच्या रुमालांचा वापर चांगला मानला जात नाही. यामुळे मन अशांत राहते. 


जर तुम्ही दररोज रुमालाचा वापर करता तर हे लक्षात ठेवा की त्याला छेद वा तो फाटलेला नसावा. असे रुमाल वापरु नयेत.