Vipreet Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी 31 मार्चला शुक्र मीन राशीत प्रवेश केला आहे. मीन राशीत राहु ग्रह आधीपासून आहे. अशा स्थितीत या दोन ग्रहांच्या संयोगाने विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रामुळे तयार झालेला विपरीत राजयोग सुमारे 50 वर्षांनी तयार झाला आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात सुखाचे सण येणार आहे. त्याचप्रमाणे या लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या विपरीत राजयोगाचा फायदा होणार आहे.


वृषभ रास (Taurus Zodiac)


विपरीत राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते. तसेच या काळात तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ मिळणार आहे. प्रत्येकजण तुम्हाला आर्थिक मदत करणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळू शकतो. वडिलांशी तुमचे संबंध चांगले राहतील. 


मिथुन रास (Mithun Zodiac)


मिथुन राशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोगाची निर्मिती शुभ ठरू शकते. नोकरदार लोकांसाठी पदोन्नतीची शक्यता आहे.  बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुमचे व्यावसायिक जीवन उत्तम असणार आहे. करिअरमध्ये अनेक उत्तम संधी मिळू शकतात. विपरित राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारांनी इतरांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकता.


मीन रास (Meen Zodiac)


विपरीत राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कुटुंबातील सर्व सदस्यांशी तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होणार आहे. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायात चांगला व्यवहार होऊ शकतो. खूप दिवसांपासून सुरू असलेला तणाव संपणार आहे. नोकरदारांना नोकरीच्या क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )