राशीभविष्य 5 फेब्रुवारी : `या` राशींच्या व्यक्तींकरता महत्वाचा दिवस
पहिल्या पाच राशींकरता अत्यंत महत्वाचा दिवस
मुंबई : नक्षत्र आपली जागा बदलत असतात. त्यानुसार माणसाच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. ग्रह आणि नक्षत्र मानवी जीवनात सर्वात महत्वाचे स्थान निभवतात. पाहूया काय आहे आजच्या 12 राशींच भविष्य
मेष - आज तुम्हाला स्वतःला तुमच्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विचारांच्या संकटात अडकलेले तुम्ही स्वतःच आज मार्ग काढाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. अविवाहित व्यक्ती आज लग्नाचा ठाम निर्णय घेऊ शकते.
वृषभ : समोरची व्यक्ती काय सांगतेय, हे आज ऐकून घ्या. जवळच्या व्यक्तींचे मार्गदर्शन महत्वाचं ठरणार आहे. निर्णय घेताना खूप काळजीपूर्वक विचार करा. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मिथुन : समोरच्या व्यक्तीच्या निर्णयाचा आदर करा. स्वतःचे आपले विचार असतात पण मोठ्यांच ऐका. आज थोडी तब्बेत नरम असेल. जुनी दुखणी डोकी वर काढतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
कर्क : लोकं काय म्हणतात याचा विचार न करता स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही प्रत्येकवेळी योग्य असू शकत नाही. त्यामुळे थोडं शांतपणे घ्या. नवीन काही तरी शिकण्याकडे तुमचा कल असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
सिंह : जरी तुम्ही कमी बोलत असलात तरी आज तुमचं मत महत्वाचं आणि ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे अगदी जबाबदारीने निर्णय घ्या. कुटुंबात आज तुमचा खूप मोठा आधार असेल. जवळच्या व्यक्तीसोबत खटके उडतील.
कन्या : आज जवळच्या व्यक्तींकडून राजकारण होत असल्याचं पाहायला मिळेल. यातून बाहेर पडण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे शांत राहा. नोकरी किंवा व्यवसायाकडे अधिक लक्ष द्या. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
तूळ : आज नात्यांमध्ये थोडा गोंधळ पाहायला मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींना आज मानसिक आधाराची गरज आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस खास आहे.
वृश्चिक : स्वतःला दोष देऊ नका. काही गोष्टी अनावधानाने घडतात. आजचा दिवस थोडा चिंतनाचा आहे. भूतकाळातील गोष्टींचा विचार करा. भविष्यातील गोष्टींसाठी सज्ज व्हाल.
धनू : आज जवळच्या व्यक्तींकडून दुखावले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे थोडं शांत राहणंच योग्य आहे. कामात चांगल यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीमध्ये पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे.
मकर : जुन्या जवळच्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. खूप दिवसांनी तुम्हाला अतिशय फ्रेश वाटेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आजचा दिवस खास असेल.
कुंभ : आजचा दिवस थोडा कंटाळवाणा असेल. मात्र तुम्ही या दिवसाला खास बनवू शकता. कुटुंबासोबत वेळ घालवाल. जोडीदाराची साथ किती महत्वाची आहे याची आज जाणीव होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
मीन : मीन राशीसाठी आजचा दिवस खास असेल. सकारात्मक विचारांनी भरलेला आजचा दिवस असेल. भूतकाळातील अनुभवावरून भविष्याकडे वाटचाल कराल. काम प्रेमाने करा. सगळ्यांचा आदर राखा याची चांगली बाजू तुम्हाला अनुभवता येईल.