Baba Vanga Predictions: बाबा वेंगांची भविष्यवाणी ऐकून रशियन सैनिकाची पत्नी रडली, ऑडिओ जगभरात व्हायरल
Baba Vanga on Russia Ukraine war: युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप अपलोड केली आहे. ज्याच्या आधारे असा दावा करण्यात आला आहे की, रशियन सैनिक आणि त्याच्या पत्नीमधील हे संभाषण त्यांचे हेर रशियातून आलेला फोन कॉल इंटरसेप्ट करत असताना रेकॉर्ड करण्यात आले होते.
Blind mystic baba vangas ukraine: बल्गेरियातील भविष्यवक्त्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी शेकडो भविष्यवाण्यांमध्ये संपूर्ण जगाबद्दल माहिती सांगितली आहे. यातील अनेक भाकीत तंतोतंत खरे ठरली आहेत. असे म्हणतात की बाबा वेंगा यांनी देखील रशिया-युक्रेन युद्धाचे अचूक भाकीत केले होते. तोच आधार घेत आता हे युद्ध आणखी दोन वर्षे लांबणार असल्याचा दावा केला जात आहे.
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने हा ऑडिओ केला शेअर
'आयरिश मिरर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बाबा वेंगाच्या (Baba Vanga) या अंदाजाने दोन्ही देशांचे सैनिक अस्वस्थ झालेले दिसत आहेत. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनमधील रशियन सैनिक आणि त्याची पत्नी यांच्यातील फोनवरील संभाषण सोशल मीडियावर अपलोड केल्याचे बोलले जात आहे.
रशियन सैनिकाची पत्नी भविष्यवाणीवर रडली
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या इंटेलिजेंस डायरेक्टरेटने यूट्यूबवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये, ती महिला तिच्या पतीला फोन कॉल करताना रडताना ऐकू येते. या संवादात रशियन सैनिक आणि त्याची पत्नी या दोघांना आणखी काही कळत नाही की किती दिवस ते एकमेकांना पाहू शकणार नाहीत, अशी व्यथा मांडत आहेत. पुढे, रशियन सैनिक त्याच्या बायकोला समजावतो- धीर धर! आता घरी परतणे अशक्य आहे, ज्यांनी हे केले त्यांचे काय झाले हे का समजत नाही. ज्याने आदेशाचे पालन केले नाही त्याचे वाईट झाले. पुढे, जोडपे बाबा वेंगाच्या भविष्यवाणीबद्दल चर्चा करतात आणि पत्नी मोठ्याने रडू लागते.
बाबा वेंगा यांची चर्चा
ऑडिओमध्ये रशियन सैनिक आपल्या पत्नीला सांगतो, 'बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार आमचे युद्ध 2024 पर्यंत चालणार आहे. कालच वाटलं की मी तुला दोन वर्ष भेटू शकणार नाही. तेव्हा त्याची बायको म्हणते, 'मला जगताही येत नाही.' त्यानंतर ती पण रडायला लागली.
बाबा वेंगा यांची भाकीत
बाबा वेंगा यांची दहा टक्के भाकिते खरी ठरली आहेत. उदाहरणार्थ 9/11 चा हल्ला, कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन यांच्यात सध्या जवळपास 7 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध. बाबा वेंगा यांनी पाच हजारांहून अधिक भविष्यवाण्या केल्या आहेत.