AASHADI EKADASHI 2022: हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. प्रत्येक एकादशीचे महत्त्व असले तरी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीचे विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. देवशयनी एकादशीला भगवान विष्णू चार महिने योग निद्रामध्ये जातात, त्यानंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवोत्थान एकादशीला भगवान विष्णू योग निद्रातून जागे होतात. या चार महिन्यांत शुभ कार्य करण्यास मनाई असते. हा चार महिन्यांचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. यंदा देवशयनी एकादशीचे व्रत १० जुलै रोजी आहे. देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा कोणत्या पद्धतीने करावी आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवशयनी एकादशी शुभ मुहूर्त 2022


देवशयनी एकादशी तिथी 09 जुलै 2022 रोजी दुपारी 04:39 वाजता सुरू होईल आणि 10 जुलै रोजी दुपारी 02:13 वाजता समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथी मानली जात असली तरी देवशयनी एकादशीचा उपवास 10 जुलै रोजी ठेवला जाईल. देवशयनी एकादशीचे पारण 11 जुलै रोजी पहाटे 5:56 ते 8:36 वाजेपर्यंत आहे.


या पद्धतीने पूजा करावी


देवशयनी एकादशीला सकाळी स्नान करून भगवान विष्णूच्या मूर्तीला गंगाजल अर्पण करावे. यानंतर विष्णु सहस्रनामाचा पाठ करून भगवान विष्णूला गोड खीर अर्पण करावी. नैवेद्यात तुळशीची पाने अवश्य घालावी. तसेच या दिवशी भगवान विष्णूला पिवळी फुले आणि पिवळी फळे अर्पण करा. या दिवशी केळीच्या झाडाला जल अर्पण करणे खूप शुभ असते.


देवशयनी एकादशीचे महत्त्व


धार्मिक मान्यतेनुसार जो भक्त देवशयनी एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा करतो. त्याच्या जीवनातून नकळत केलेली सर्व पापे नष्ट होतात. इतकेच नाही तर या दिवशी पूजा केल्याने महिलांना सौभाग्य प्राप्त होते, तसेच प्रत्येक इच्छा पूर्ण होते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)