Adhik Maas Amavasya 2023 : येत्या बुधवारी 16 ऑगस्टला अधिक मास अमावस्या आहे. 19 वर्षांनंतर अधिक मास अमावस्याला एक शुभ योगायोग जुळून आला आहे. पंचांगानुसार 16 ऑगस्टला दुपारी 03:07 वाजता अधिक मास समाप्त होणार आहे. त्यानंतर श्रावण महिन्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. यंदाची अधिक मास अमावस्या 5 राशीच्या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (adhik maas amavasya 2023 after 19 years auspicious yoga 16 August these zodiac signs luck will be shine)


वृषभ (Taurus) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी अधिक मास अमावस्या खूप शुभ असणार आहे. कामात प्रगती आणि यश प्राप्त होणार आहे. पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. शत्रूंवर विजय मिळवण्यास यशस्वी होणार आहात. मात्र, या दिवशी वादविवादापासून दूर राहा.


कन्या (Virgo)


या लोकांसाठी अधिक मास अमावस्याअनेक क्षेत्रात शुभ आणि फलदायी ठरणार आहे. विशेषत: व्यवसाय करणाऱ्या लोकांना जास्त फायदा होणार आहे. नोकरदारांचे निर्णय कौतुकास्पद ठरणार आहेत. या दिवशी तुम्ही मित्रांसोबत सहलीला जाऊ शकता आणि आनंदाचं वातावरण असणार आहे.


तूळ (Libra)


अधिक मास अमावस्या या राशींसाठी आनंद घेऊन येणार आहे. तुम्हाला बढती मिळणार आहे. तुमचा बॉस तुमच्यावर अतिशय खूश असणार आहे. तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. अविवाहित लग्नाचे प्रस्ताव येणार आहे. कार्यक्षेत्रात तुमची प्रगती आणि लाभ होणार आहे. 


वृश्चिक (Scorpio)


अधिक मास अमावस्येचा दिवस व्यापारी वर्गासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. ते एक मोठा सौदा किंवा मोठा नफा तुम्हाला मिळणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठं यश मिळणार आहे. नोकरदार कामात मग्न असणार आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होणार आहे. 


कुंभ (Aquarius) 


या राशीच्या लोकांसाठी अमावस्या अधिक आनंद घेऊन येणार आहे. कुटुंबात सुख-शांतीचं वातावरण असणार आहे. व्यावसायिकांसाठी हा दिवस खूप चांगला सिद्ध होणार आहे. तुमचं काम यशस्वी होणार आहे. तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि पालकांचं तुम्हाला सहकार्य लाभणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Astrology 2023 : भद्रा राजयोगामुळे बदलणार 3 राशींचं भाग्य, बुध ग्रह करणार तुम्हाला मालामाल



( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )