Adhik Maas Purnima 2023 : अधिकमास पौर्णिमेला धनलक्ष्मीचं पूजन पुण्यदायी! पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि उपाय
Adhik Maas Purnima 2023 : आज अधिक मासातील पौर्णिमा आहे. आजच्या पौर्णिमेला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. आज लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्यास आर्थिक स्थिती चांगली होते.
Adhik Maas Purnima 2023 : आजची अधिक मास पौर्णिमा अतिशय शुभ आहे. आज तीन शुभ योग जुळून आले आहेत. अधिक मास हा महिना भगवान विष्णूला समर्पित करण्यात आला आहे. तर पौर्णिमा ही लक्ष्मी मातेला समर्पित असते. अशात विष्णू लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्यास जाचकाच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होतं. पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे अमृतप्राप्ती होते, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. (adhik maas purnima 2023 shubh muhurat time auspicious yoga maa laxmi puja vidhi upay dhan lakshmi) आजच्या दिवशी सत्यनारायणायची पूजा करणे ही शुभ मानले जाते.
अधिक मास पौर्णिमा 2023 मुहूर्त
अधिकामास पौर्णिमा तिथी - पहाटे 03.51 वाजता सुरुवात
अधिकामास पौर्णिमा तारीख समाप्त - 2 ऑगस्ट 2023 दुपारी 12.01 वाजेपर्यंत
स्नान-दान मुहूर्त - पहाटे 04.18 पासून सकाळी 05.00 वाजेपर्यंत
सत्यनारायण पूजा - सकाळी 09.05 ते दुपारी 12.27 वाजेपर्यंत
चंद्रोदयाची वेळ - संध्याकाळी 07.16
माता लक्ष्मी पूजा - दुपारी 12.07 पासून 2 ऑगस्ट 2023 दुपारी 12.48 वाजेपर्यंत
अधिक मास पौर्णिमा 2023 शुभ योग
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि शुक्र यांच्या सिंह राशीत युती होतं आहे. त्यामुळे आज प्रीति योग, आयुष्मान योग आणि लक्ष्मी नारायण योग निर्माण झाला आहे.
आयुष्मान योग - संध्याकाळी 06.53 वाजेपासून 02 ऑगस्ट 2023 दुपारी 02.34 वाजेपर्यंत
प्रीती योग - 31 जुलै 2023 रात्री 11.05 पासून 01 ऑगस्ट 2023 सकाळी 06.53 वाजेपर्यंत
लक्ष्मी नारायण योग - दिवसभर असणार आहे. हा योग म्हणजे धनसमृद्धी वाढविणारा योग आहे.
अधिक मास पौर्णिमा पूजा विधी
पहाटे शुभ मुहूर्तावर स्नान करुन सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करा. सत्यनारायणाची कथा वाचा. संध्याकाळी दिवा लावून तुळशी मातेला दिवा लावा. आता चंद्राला अर्घ्य अर्पण करा आणि धन समृद्धीसाठी प्रार्थना करा.
श्रावण पौर्णिमेला संपत्ती वाढवण्याचे उपाय
आज दुधात पाणी मिसळून त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते.
आज विष्णु सहस्त्रनाम पठण केल्याने तुम्हाला लाभ होईल. यासोबतच पिठाच्या पंजिरीमध्ये भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करा.
संपत्ती मिळविण्यासाठी आज रात्री चंद्राला दूध अर्पण करा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)