Vinayak Chaturthi 2023 : श्रावण अधिक मासाला सुरुवात झाली आहे. आज पंचांगानुसार श्रावण अधिक मासातील विनायक चतुर्थी आहे. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थी ही विनायक चतुर्थी असते. आजची विनायक चतुर्थी अतिशय खास आहे. (Adhik Maas Vinayak Chaturthi puja time muhurat vidhi significance Sawan Maas 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज शुक्रवार माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस आहे. त्या शिवाय अधिक मास हा विष्णूचा महिना तर श्रावण हा भगवान शंकराचा प्रिय महिना. म्हणजे आज माता लक्ष्मी, विघ्नहर्ता गणराया, विष्णू आणि महादेवाची अशा चार देवांची एकत्र आशिर्वाद मिळण्याचा दिवस. 


अधिक मास विनायक चतुर्थी 2023 मुहूर्त 


पंचांगानुसार आज सकाळी 06.58 वाजता चतुर्थीला सुरुवात होणार आहे. तर 22 जुलै 2023  सकाळी 09.26 वाजेपर्यंत असणार आहे. 


गणेश पूजन मुहूर्त - सकाळी 11.05 ते दुपारी 01.50 वाजेपर्यंत 


विनायक चतुर्थीचे महत्व


दर तीन वर्षांनी अधिक मास येतं असतो. त्यामुळेच या महिन्यातील प्रत्येक व्रत आणि सणाचे विशेष महत्त्व असतं. असं म्हणतात की, अधिक मासातील धार्मिक कार्याचे इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या उपासनेपेक्षा 10 पट अधिक फळ देतं. आजच्या दिवशी गणरायाची उपासना आर्थिक संकटापासून मुक्ती मिळते. संतान प्राप्तासाठी हे व्रत फलदायी मानलं जातं. 


विनायक चतुर्थी पूजा विधी 


पूजा मुहूर्तावर पूर्वेकडे तोंड करून 108 दूर्वाच्या पानांनी गणपतीची पूजा करा.  गाईच्या तुपाचा दिवा लावून वक्रतुंडया हुं मंत्राचा 108 वेळा जप करा. नामजप केल्यावर या दुर्वाच्या पानांनी पूजेच्या ठिकाणी ठेवलेले पाणी घरभर शिंपडावं. असं म्हणतात हे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)