Tirgrahi Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसार राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या गोचरवेळी इतर ग्रहांशी देखील त्यांचा संयोग होतो. शिवाय यावेळी अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. नव्या वर्षात खास त्रिग्रही योग तयार करतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला शुक्र, सूर्य आणि मंगळाचा संयोग होणार आहे. त्यामुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. हा योग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव पाडणार आहे. पण अशा 3 राशी आहेत ज्यांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहेत. जाणून घेऊया त्रिग्रही योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे. 


मकर रास (Makar Zodiac)


त्रिग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमचं काम आणि व्यवसाय चांगल्या पद्धतीने होणार आहे. पैशाशी संबंधित योजना यशस्वी होणार आहेत. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. हे वर्ष तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने उत्कृष्ट सिद्ध होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील. 


तूळ रास (Tula Zodiac)


सूर्य, मंगळ आणि शुक्र यांचा संयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. यावेळी वाहन व मालमत्तेचे सुख मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल.  नवीन काम सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.


वृषभ रास (Taurus Zodiac)


त्रिग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तुमचे महत्त्वाचं काम पूर्ण होईल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. यावेळी तुम्ही धार्मिक कार्यात पैसे खर्च करू शकता. तुम्ही कोणत्याही कर्जाची परतफेड देखील करू शकता. हे वर्ष व्यावसायिकांसाठी शुभ सिद्ध होईल, त्यांना चांगले आर्थिक लाभ मिळतील.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)