Surya-Shani: 100 वर्षांनंतर एकत्र नक्षत्र गोचर करणार शनी-सूर्य; `या` राशी होणार मालामाल
Surya And Shani Nakshatra Parivartan: ग्रहांचा राजा सूर्य उत्तराषाद नक्षत्रात आणि कर्म दाता शनी शतभिषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात गोचर करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल.
Surya And Shani Nakshatra Parivartan: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह नक्षत्रात देखील बदल करतात. ग्रहांच्या नक्षत्र गोचरचा मानवी जीवनावर होताना दिसून येतो. 11 जानेवारीला पौष अमावस्या, सूर्य आणि शनिदेव त्यांच्या नक्षत्राच बदल करणार आहे.
ग्रहांचा राजा सूर्य उत्तराषाद नक्षत्रात आणि कर्म दाता शनी शतभिषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात गोचर करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा 3 राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींचं नशीब यावेळी चमकणार आहे.
तूळ रास (Tula Zodiac)
सूर्य आणि शनीचे नक्षत्र बदल तुमच्यासाठी शुभ ठरू शकतात. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात पैशाशी संबंधित परिस्थिती सुधारण्याची वेळ आली आहे. यावेळी तुम्ही देश-विदेशात सहलीला जाऊ शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यावेळी तुम्हाला प्रेमसंबंधातही यश मिळेल. नवीन स्रोतातून पैसे मिळवण्यातही तुम्ही यशस्वी होणार आहात.
कर्क रास (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचे नक्षत्र बदल फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. या काळात तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचं धैर्य आणि पराक्रम वाढणार आहे. काही व्यावसायिक करार अंतिम करू शकतात. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.
सिंह रास (Leo Zodiac)
सूर्य आणि शनीचे नक्षत्र बदल तुमच्यासाठी उत्पन्न आणि लाभाच्या दृष्टीने शुभ सिद्ध होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कुटुंबात समृद्धी आणि शांततेचे वातावरण असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. स्टॉक मार्केट आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची आहे ते करू शकतात. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)